PM Modi America Visit Sakal
देश

PM Modi America Visit : ...अन् अमेरिका भेटीदरम्यान वाजपेयी नाईट क्लबमध्ये पोहोचले

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत पोहोचले आहेत. या भेटीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये आणखीनच उमेद वाढणार असल्याचे बोलले जात आहे . विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच राज्याच्या दौऱ्यावर अमेरिकेला पोहोचले आहेत. याआधीही त्यांनी गेल्या 9 वर्षांत अमेरिकेच्या अनेक दौरे केले आहेत. मात्र ते केवळ अधिकृत आणि कामकाजानिमित्त केलेले दौरे होते.

भारताच्या नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर अनेकवेळा अमेरिकेला भेट दिली आहे, या भेटींमध्ये अशा काही घटनाही घडल्या ज्याचे रंजक किस्से बनले. आज आम्ही तुम्हाला भारतीय नेत्यांच्या अमेरिका दौऱ्यातील काही निवडक किस्से सांगत आहोत.

जेव्हा अटलबिहारी वाजपेयी नाईट क्लबमध्ये पोहोचले

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या अमेरिका दौऱ्यात ते नाईट क्लबमध्ये पोहोचले असताना एक मनोरंजक घटना घडली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित 'वाजपेयी : द एसेंट ऑफ द हिंदू राइट' या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. 1960 मध्ये जेव्हा ते अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांची एका IFS शी मैत्री झाली होती. ते एकत्र न्यूयॉर्कला गेले आणि तेथील संग्रहालये, आर्ट गॅलरी आणि नाइटक्लबला भेट दिली. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी निवडलेल्या शिष्टमंडळाचा भाग होते.

वाजपेयी: द एसेंट ऑफ द हिंदू राइट या पुस्तकानुसार, 1960 मध्ये न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या वास्तव्यादरम्यान, अटलजी IFS अधिकारी महाराजकृष्ण रसगोत्रा यांच्यासोबत राहिले. त्याचवेळी रसगोत्रा यांनी अटलबिहारी वाजपेयींना नाईट क्लबमध्ये नेले होते, असे सांगण्यात आले आहे. पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे की, त्यावेळी अटलजींना नाईट क्लब म्हणजे काय हे माहित नव्हते.

जेव्हा इंदिरा गांधींनी नाचण्यास नकार दिला होता

अमेरिका दौऱ्याची एक रंजक गोष्ट इंदिरा गांधींशीही संबंधित आहे. ही वस्तुस्थिती फार कमी लोकांना माहिती आहे. 1966 मध्ये जेव्हा इंदिरा गांधी अमेरिकेच्या पहिल्या दौऱ्यावर गेल्या होत्या तेव्हा तिथे त्यांच्या सन्मानार्थ डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

इंदर मल्होत्रा यांनी लिहिलेल्या इंदिरा गांधी ए पर्सनल अँड पॉलिटिकल बायोग्राफी या पुस्तकात या घटनेचा उल्लेख आहे. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी इंदिरा गांधी यांच्या सन्मानार्थ व्हाईट हाऊसमध्ये डिनरचे आयोजन केले होते, असे सांगण्यात आले आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी इंदिरा गांधींना डान्स फ्लोअरवर बोलावलं तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला. पुस्तकानुसार, इंदिरा गांधी यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारतीय पंतप्रधान जर बॉलरूममध्ये नाचले तर भारतीयांना ते अजिबात आवडणार नाही.

जेव्हा मनमोहन सिंग यांनी पेप्सिकोच्या सीईओची खिल्ली उडवली

2009 मध्ये अमेरिकेच्या पहिल्या राज्य दौऱ्यावर गेलेले तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी पेप्सिकोच्या सीईओबाबत अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची चिमटा काढला होता.

पेप्सीकोच्या माजी सीईओ इंद्रा नूयी यांनी त्यांच्या 'माय लाइफ इन फुल' या संस्मरणात याचा उल्लेख केला आहे. त्यांनी 2009 मध्ये वॉशिंग्टन डीसीमध्ये दोन डझन शीर्ष भारतीय आणि अमेरिकन उद्योगपतींसोबत बाइक राइडसाठी पोहोचल्याचं वर्णन केलं आहे. येथे त्या भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत उभ्या होत्या.

जेव्हा ओबामा यांनी त्यांच्या टीमची ओळख करून देण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी सांगितले की या पेप्सीकोच्या सीईओ इंद्रा नूयी आहेत. यावर मनमोहन सिंग हसले आणि म्हणाले की अरे पण इंद्रा नूयी आमच्या बाजूने आहेत. ओबामाही हसले आणि म्हणाले की नाही, त्या आमच्या बाजूने आहेत. खुद्द इंद्रा नूयी या क्षणाचं वर्णन अविस्मरणीय असं केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT