Narendra Modi and Bappi Lahiri टिम ई सकाळ
देश

"बप्पी लहरींचा जिंदादील स्वभाव सर्वांच्या लक्षात राहील"

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुध्दा बप्पी लहरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचे वयाच्या ६९ वर्षी निधन झाले. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या या निधनावर सर्वच क्षेत्रातुन शोक व्यक्त केला जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदीसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीटद्वारे त्यांना श्रध्दांजली वाहली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बप्पी लहरीसोबतचा एक फोटो शेयर करत म्हणाले, “श्री बप्पी लाहिरी जी यांचे संगीत सर्वसमावेशक, विविध भावना सुंदरपणे व्यक्त करणारे होते. त्यांचा जिंदादील स्वभाव सर्वांच्या लक्षात राहील. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना संवेदना. ओम शांती."

तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुध्दा बप्पी लहरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. अमित शहा ट्वीटद्वारे म्हणाले, “दिग्गज गायक आणि संगीतकार, बप्पी लाहिरी जी यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बप्पी दा त्यांच्या अष्टपैलू गायनासाठी आणि जिवंत स्वभावासाठी लक्षात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना माझ्या संवेदना. ओम शांती.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT