PM Narendra Modi And CM Yogi Adityanath Uttar Pradesh BJP Esakal
देश

Yogi Adityanath: भाजपमध्ये भूकंप? मोदी, अमित शाह अन् योगी अदित्यनाथ... 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर राजकारण तापले

PM Narendra Modi: बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजपने गेल्या वेळी 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. यंदा मात्र ते 36 जागांवर घसरले.

आशुतोष मसगौंडे

भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक पार पडली. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर या बैठकीसाठी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही उपस्थिती होती.

दरम्यान या बैठकीतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये भाजमध्ये मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नेमकं काय घडलं?

दिल्लीतील या बैठकीसाठी भाजपचे सरकार असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आधीच बैठकीच्या दालनात हजर झाले होते. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बैठकीच्या दालनात आले तेव्हा सर्वांनी एकमेकांना नमस्कार केला. पण यामध्ये अमित शाह आणि योगी अदित्यनाथ यांनी नमस्कार तर सोडाच एकमेकांकडे पाहिलेही नाही.

असे असले तरी योगी अदित्यनाथ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना मात्र नमस्कार केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बैठकीच्या दालनात प्रवेश झाला, तेव्हा पंतप्रधानांनी सर्व उपस्थितांना नमस्कार केला. पण या वेळी योगी अदित्यनाथ वगळता सर्वांनी मोदींना नमस्कार केल्याचे दिसत आहे.

योगी अदित्यनाथांना हटवण्याची चर्चा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला देशभरातून फटका बसला. गेल्या वेळी 300 हून अधिक जागा जिंकणारा भाजप यंदा 240 जागांवरच अडकला.

दुसरीकडे बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजपने गेल्या वेळी 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. यंदा मात्र ते 36 जागांवर घसरले. त्यामुळे मोदी-शाह योगी अदित्यनाथ यांच्या कामगिरीवर नाराज असल्याच्या चर्चा सतत सुरू असतात.

अशात या निकालानंतर मोदी आणि शाह योगी अदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवणार असल्याचे दावे अनेकजन करत आहेत. आता नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर मोदी, शाह आणि अदित्यनाथ यांच्यातील नाते बिघडले असल्याचे दाव्यांनी पुन्हा जोर धरला आहे.

दुसरीकडे यंदा एकहाती बहुमत मिळवता न आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्र पक्षांची मर्जी राखून काम करावे लागणार आहे. एनडीएमध्ये भाजपनंतर तलगू देसम आणि संयुक्त जनता दल हे दोन मोठे पक्ष आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना योग्य मान मिळावा म्हणून मोदींना कसरत करावी लागत आहे.

गेल्या आठवड्या जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातही आंध्र प्रदेश आणि बिहारसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. यावरूनच दिसते की पंतप्रधान मोदींना आपले पद टिकवण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना सांभाळावे लागत आहे, असा आरोप विरोधक करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT