Narendra Modi 
देश

Ayodhya Verdict : निकाल म्हणजे कोणाचा विजय किंवा पराभव नाही : मोदी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अयोध्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उद्या येत आहे. अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा येणारा निर्णय हा कोणाचा विजय किंवा पराभव ठरणार नाही. देशवासीयांना माझे आवाहन आहे की, या निर्णयाने भारताची शांतता, ऐक्‍य आणि सद्भावनेच्या महान परंपरेला आणखी दृढ करणे हे आपल्या सर्वांचे प्राधान्य असले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

अयोध्येतील ऐतिहासिक रामजन्मभूमी- बाबरी मशीद जमीनवादासंदर्भात सर्वोच्च न्यायालय उद्या (ता. 9) ऐतिहासिक निकाल देणार आहे. सकाळी साडेदहापासून ही सुनावणी सुरू होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ हा निकाल देईल. सर्वोच्च न्यायालयाकडून अयोध्याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या घटनापीठामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. उद्या प्रामुख्याने निकालाचे सारांशात्मक टिप्पण वाचून दाखविण्यात येईल. यामध्ये न्यायालयातर्फे निकालातील सर्वपैलू स्पष्ट केले जातील. या खटल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अयोध्येच्या खटल्यात सहभागी असलेल्या हिंदू संघटना त्याचप्रमाणे मुस्लिम संघटनांनी पुढाकार घेऊन संयुक्त बैठकांद्वारे शांततेचे आवाहन केले आहे. 

मोदींनी म्हटले आहे, की अयोध्येचा ऐतिहासिक निकालाकडे देशवासिंयांचे लक्ष लागले आहे. या निकालाकडे जय-पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका. हा निकाल म्हणजे कोणाचा विजय किंवा पराभव नाही, निकाल काहीही येवो. देशातील नागरिकांनी शांतता, एकता आणि सद्भावना कायम राखावी. सर्वोच्च न्यायालयात गेल्या काही महिन्यापासून अयोध्या प्रकरणावर निरंतर सुनावणी होत होती. या काळात समाजातील सर्व वर्गांकडून सौहार्दाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही चांगली गोष्ट होती. शनिवारी येणाऱ्या कोर्टाच्या निर्णयानंतरही आपल्याला शांतता कायम राखायची आहे. कोर्टाकडून येणारा निर्णय म्हणजे जय-पराजय नाही. शांती, आणि एकता कायम राखणं ही आपल्या देशाची महान परंपरा आहे. या परंपरेला आणखी बळ द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

SCROLL FOR NEXT