PM Modi Birthday
PM Modi Birthday esakal
देश

PM Modi Birthday : पंतप्रधानांच्या वस्तू तुम्हाला हव्यात? असे व्हा लिलावात सहभागी

सकाळ डिजिटल टीम

Auction of Gift Articles : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दरवर्षी हजारो वस्तू भेट म्हणून मिळतात. या वस्तू मौल्यवान असतात. त्या वस्तूंचा दर वर्षी लिलाव करण्यात येतो. या लिलावातून मिळणारी रक्कम एखाद्या विशेष कार्यासाठी वापरली जाते. यंदाही पंतप्रधानांच्या वाढदिवशी या भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे.

हा लिलाव ऑनलाइन पद्धतीने होईल. त्यात कोणकोणत्या वस्तू असतील, त्यांची बेस प्राइस काय असेल व त्यासाठीची वेबसाइट कोणती याबाबत माहिती घेऊ या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होण्याचं हे चौथं वर्ष आहे.

यंदा या लिलावात १२२२ वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तूंची बेस प्राइस ठरवून घेतली जाते. त्यापुढे त्या वस्तूंवर बोली लावून त्यांचा लिलाव केला जातो. पंतप्रधानांच्या वाढदिवशी म्हणजे १७ सप्टेंबरला हा लिलाव सुरू होऊन तो २ ऑक्टोबरपर्यंत चालेल. गेल्या वर्षी या लिलावात १३०० हून अधिक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. त्यांच्या लिलावातून सांस्कृतिक मंत्रालयाला १६ कोटी रुपये मिळाले होते.

भारतीय खेळाडू, राजकीय व्यक्ती, नेतेमंडळी यांच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू यात आहेत. Pmmementos.gov.in या वेबसाइटवर या भेटवस्तूंची किंमत व या लिलावासंबंधी अधिक माहिती उपलब्ध आहे. या वेबसाइटवर या वस्तू पाहता येतील व त्यांची खरेदीही करता येईल.

लिलावात कोणत्या वस्तू असणार

  • या लिलावात पंतप्रधानांना विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी दिलेल्या, संस्थांनी दिलेल्या भेटवस्तू आहेत.

  • कॉमनवेल्थ, ऑलिम्पिक स्पर्धांमधल्या खेळाडूंनी दिलेल्या भेटवस्तूही यात आहेत.

  • मधुबनी पेंटिंगपासून ते चेन्नईतल्या बुद्धिबळ स्पर्धेत देण्यात आलेले बुद्धिबळाचे पटही आहेत.

  • मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पंतप्रधानांना दिलेली राणी कमलापती यांची मूर्ती असेल.

  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली हनुमानाची मूर्ती

  • हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याकडून मिळालेला त्रिशूळ

मिळालेल्या रकमेचे काय?

या लिलावातून उभी राहिलेली रक्कम ‘नमामि गंगे’ प्रकल्पाला दिली जाणार आहे. गंगा नदीचं प्रदूषण कमी करून नदीची स्वच्छता व संवर्धन करण्यासाठी मोदी सरकारनं २०१४ मध्ये या प्रकल्पाला सुरुवात केली आहे.

बेस प्राइस किती?

यंदाच्या या लिलावात १०० रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंत बेस प्राइस असलेल्या वस्तू आहेत. एकूण बेस प्राईसचा विचार केला, तर यंदा अडीच कोटी रुपयांच्या भेटवस्तू लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT