PM narendra modi, PM Narendra Modi speech on BJP foundation day
PM narendra modi, PM Narendra Modi speech on BJP foundation day Narendra Modi
देश

BJPच्या वर्धापनदिनी PM मोदींचा घराणेशाहीवर हल्ला; म्हणाले, वोट बँकेचं राजकारण...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आज भारतीय जनता पक्षाचा 42 वा स्थापना दिवस आहे.(BJP Foundation Day 2022) या दिनाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे. पक्षाकडून सात एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत देशभरात सामाजिक न्यायाच्या मुद्यांवर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच या अभियानामध्ये पक्षाचे कार्यकर्ते मोदी सरकारच्या जनकल्याणकारी योजनांबाबत जनतेमध्ये जागृती घडवून आणणार आहेत. 14 एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, त्या दिवसाचं औचित्य साधतही हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. (Narendra Modi)

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना सदिच्छा... अनेकांनी जनसंघ पासून भाजपपर्यंत स्वत:ला गाडून घेतलं, त्या सर्वांना नमन करतो. हा स्थापना दिवस तीन कारणांनी महत्त्वाचा आहे. यावर्षी देशाची पंच्याहत्तरी साजरी करतो आहोत. दुसरं कारण आहे गतीने बदलत असलेली जागतिक परिस्थितीमध्ये भारतामध्ये सातत्याने नव्या शक्यता तयार होत आहेत. तिसरं म्हणजे चार राज्यांमध्ये भाजपचं सरकार परत सत्तेवर आलं आहे. तीन दशकांनंतर राज्यसभेमध्ये एखाद्या पक्षाची संख्या 100 च्या वर पोहोचली आहे. भाजपचं काम सातत्याने वाढत आहे. हा अमृतकाळ भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कर्तव्यकाल आहे. (PM Narendra Modi speech on BJP foundation day)

पुढे त्यांनी म्हटलंय की, आधी देशात निराशा होती. आज देशातील प्रत्येकजण म्हणतोय की देश बदलतो आहे, गतीने प्रगती करतो आहे. कसल्याही भीतीविना आपल्या हितांसाठी लोक काम करत आहेत. भारत 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य देत आहे. सबका साथ, सबका विकास सोबतच आम्ही सबका विश्वासही प्राप्त करत आहोत. शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारी लाभ पोहचवला जावा, हाच उद्देश आहे. जेंव्हा हे घडतं तेंव्हा पक्षपात आणि भेदभाव टिकू शकत नाही. त्यामुळे आपलं हे सेवाभाव अभियान सामाजिक न्यायाचं उदाहरण आहे. भाजपच्या कार्यकर्त्याला प्रत्येक घरात जाऊन आपला विचार द्यायचा आहे.

पुढे काँग्रेसवर टीका करत मोदी म्हणाले की, काही पक्षांनी दशकांपासून फक्त वोट बँकेचं राजकारण केलं. काही लोकांनाच आश्वासन द्यायचं. काहींना त्रास द्यायचा, असंच चालू राहिलं. भेदभाव भ्रष्टाचार हे वोट बँकेच्या राजकारणाचा साईड इफेक्ट होता. भाजपने या साऱ्याला टक्कर दिली तसेच देशवासीयांना याचं महत्त्व पटवून दिलं. भाजपचं चांगलं काम असल्याने जनतेकडून आशीर्वाद मिळत आहे. देशात असं सरकार आहे, ज्याची वैचारिक निष्ठा अंत्योदयात आहे. गरीब, वंचित आणि महिलांसाठी काम करणं हे आमचे मूळ सरकार आहे. देशाने महिलांना नवे अधिकार दिले. सुशासन आणि कठोर कायद्यांतून सुरक्षेची भावना तयार केली. त्यांच्या आरोग्यापासून ते स्वयंपाकघराची चिंता मिटवून टाकली आणि त्यांचं आयुष्य बदलवून टाकलं आहे.

ते म्हणाले की, देशात दोन प्रकारचे राजकारण सुरु आहे. एक राजकारण आहे परिवार भक्तीचं आणि दुसरं आहे राष्ट्रभक्तीचं राजकारण... केंद्रीय स्तरावर काही राजकीय पक्ष आहेत जे आपापल्या कुटुंबाच्या भल्यासाठी काम करत आहेत. यामध्ये परिवारातील सदस्यांचाच स्थानिक पातळीवरील राजकारणामध्ये दबदबा राहतो. गेल्या दशकामध्ये यामुळे देशाचं नुकसान झालं आहे. पहिल्यांदा भाजपनेच यावर बोलायला सुरु केलं आणि निवडणुकीतील मुद्दा बनवला. देशातील तरुण आता हळूहळू हे ओळखू लागले आहेत की परिवारवादी पक्ष लोकशाहीचे शत्रू कसे आहेत. लोकशाहीसोबत खेळणारे हे पक्ष संविधान आणि त्याच्या व्यवस्थांचा खेळ करत आहेत. लोकशाहीविरोधी शक्तींना नेस्तनाबूत केल्याशिवाय आपण थांबायचं नाहीये, असा एल्गारही त्यांनी पुकारला आहे.

पंतप्रधान मोदी आज सकाळी 10 वाजता व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगच्या माध्यमातून स्थापना दिनानिमित्त आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील. याचं थेट प्रसारण पक्षाच्या वेबसाईटसहित युट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील केलं जाईल.

पंतप्रधान मोदींनी काल ट्विट करत म्हटलंय की, उद्या, सहा एप्रिल आपल्या भाजप कार्यकर्त्यांसाठी एक विशेष दिवस आहे. आपल्या पक्षाचा स्थापना दिवस आहे. आम्ही त्या सर्वांचे स्मरण करतो ज्यांनी या पक्षाची उभारणी केली आणि लोकांची अविरत सेवा केली. उद्या सकाळी दहा वाजता सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करेन, सामील व्हा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

SCROLL FOR NEXT