PM Narendra Modi, Japan Prime Minister, Yoshihide Suga  
देश

सुगा झाले पंतप्रधान; PM मोदींनी जपानी भाषेत दिल्या शुभेच्छा!

सकाळ ऑनलाईन टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे नव नियुक्त पंतप्रधान योशिहिडे सुगा यांचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे मोदींनी इंग्रजीसह जपानी भाषेत ट्विट करत सुगा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी ट्विटमध्ये लिहिलंय की,  जपानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. इंडो-जपान यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करुन विशेष रणनिती आखण्यासाठी संयुक्तपणे काम करु. 

भारत आणि जपान यांच्यातील द्विपक्षिय संबंध चांगले आहेत. नुकताच भारताने अमेरिका, फ्रांस, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया या राष्ट्रांप्रमाणे जपानसोबत संरक्षणसंदर्भातील खास करार केला होता. उभय देशांत सैन्यबळाची पूर्तता आणि त्यासंबधी साहित्य आदान-प्रदानाबाबत करार झाला आहे.  युद्धपरिस्थिती निर्माण झालीच तर भारत आणि जपान हे एकमेकांना मदत देऊ करतील. या करारामुळे सीमारेषेवर कुरापती करणाऱ्या चीनविरोधात भारताची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.  

जपानच्या सत्ताधारी पक्षाचे नेते आणि माजी पंतप्रधान अबे यांनी प्रकृती अस्वस्थामुळे पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर  योशिहिडे सुगा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे. सुगा यांना लोवर हाऊसमध्ये 462 पैकी 314 मते मिळाली. सभागृहात सत्ताधारी पक्षाचे बहुमत आहे. त्यामुळे सुगा यांचा सहज विजय झाला.   
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT