PM Narendra Modi International Yoga Day Sakal
देश

International Yoga Day 2023: वयाची सत्तरी ओलांडली तरीही PM मोदी एकदम फिट; योगासनं, डाएट अन्....

पंतप्रधान मोदींच्या आरोग्याचं आणि फिटनेसचं रहस्य काय आहे, जाणून घ्या...

वैष्णवी कारंजकर

आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून रोजी साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी योगसाधनेचा प्रचार आणि प्रसार जागतिक स्तरावर करत आहे. मोदी सध्या ७२ वर्षांचे आहेत. या वयातही त्यांची स्फूर्ती आणि फिटनेस अगदी वाखाणण्याजोगा आहे. ते सतत उत्साही असतात आणि काम करत असतात.

स्वतःला निरोगी राखण्यासाठी पंतप्रधान मोदी आपल्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतात. तसंच आपल्या दिनचर्येकडेही ते खास लक्ष देतात. मोदी स्वतःसुद्धा योगासने करतात. त्यांच्या फिटनेसचं रहस्य काय आहे? जाणून घ्या त्यांचा आहार आणि योगाभ्यासाबद्दल...

नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे योगाचे समर्थक आहेत, हे तर उघडच आहे. योग शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक आहे. नरेंद्र मोदी यांनाही योगाभ्यासाचे फायदे माहित आहेत. त्यामुळे ते आपल्या दिवसाची सुरुवात मॉर्निंग वॉक आणि मेडिटेशनने करतात. तसंच ते नियमितपणे योगाभ्यास, प्राणायाम आणि सूर्यनमस्कारही करतात.

पंतप्रधान मोदींचा डाएट प्लॅन काय आहे?

निरोगी राहण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपल्या डाएटवर विशेष लक्ष दिलं आहे. ते मसालेदार जेवण टाळतात. गुजराती जेवण आणि खिचडी हे त्यांचं आवडीचं जेवण आहे. नरेंद्र मोदी नेहमी संतुलित आहार घेणं पसंत करतात. त्यांच्या आहारामध्ये ताजी फळं, भाज्या आणि दह्याचा समावेश असतो. नरेंद्र मोदींना पराठे आणि मशरुमही आवडतात. तसंच ते मोड आलेली कडधान्येही खातात.

शरीराला कायम हायड्रेट ठेवतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला हायड्रेट राखण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी, ज्यूस यांचं सेवन करतात. पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी ते १२ महिने कोमट पाणी पितात.  रॅली आणि सभांमध्ये बोलताना आवाज व्यवस्थित राहावा, यासाठी ते आपल्या घशाचीही काळजी घेतात आणि थंड पाणी पिणं टाळतात.

पंतप्रधान मोदींची दिनचर्या कशी आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन ते चार तासच झोपतात. अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या एका मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं की, ते पहाटे पाच वाजताच उठतात. त्यानंतर ते योगासनं आणि व्यायाम करतात. त्यानंतर काही वेळ मॉर्निंग वॉक करतात आणि ९ वाजेपर्यंत नाश्ता करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ७०–८० वयातही शिकण्याची धडपड! महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे ‘आजीबाईंची शाळा’; व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल भावूक

नव्या नवरीवर भारी पडला जाऊबाईंचा तोरा! अनुष्कापेक्षा सुंदर दिसते तिची जाऊ; मेघनच्या वहिनीला पाहिलंत का?

Horoscope Prediction : उद्या तयार होतोय गजकेसरी राजयोग; मिथुन राशीबरोबर पाच राशींना लागणार जॅकपॉट !

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

SCROLL FOR NEXT