modi
modi 
देश

तब्बल 16 महिन्यांनंतर मोदींचा परदेश दौरा; कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच जाणार देशाबाहेर

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याच परदेश दौऱ्यावर गेले नाहीयेत. आता देशात आणि जगात लसीकरणाची मोहीम सुरु झाली आहे त्यामुळे पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी तयार आहेत. परदेश वारीवरुन मोदी नेहमीच विरोधकांच्या आणि टीकाकारांच्या निशाण्यावर राहिले आहेत. कोरोना संकाटमुळे पंतप्रधान मोदींना कुठेही परदेश वारी करता आली नव्हती. मात्र, आता पंतप्रधान तब्बल 16 महिन्यांनंतर मोदी देशाबाहेर जाणार आहेत. मोदी आता येत्या 26 आणि 27 मार्च रोजी बांग्लादेशच्या दौऱ्यावर जात आहेत. पंतप्रधान मोदींचा हा बांग्लादेश दौरा अनेक कारणांमुळे चर्चेत राहण्याची शक्यता आहे. 

पहिलं कारण हे आहे की बांग्लादेश आपला 50 वा स्वांतत्र्यदिन साजरा करत आहे. तसेच या दरम्यानच वंगबंधु शेख मुजीबुर्रहमान यांची जन्म शताब्दी वर्ष आहे. यासोबतच भारत आणि बांग्लादेशच्या दरम्यान राजकीय नात्याचं 50 वं वर्ष आहे. भारताच्या नेबरहुड फर्स्ट आणि ऍक्ट ईस्ट पॉलिसीमुळेच आज भारत आणि  बांग्लादेशच्या दरम्यानचे नाते मजबूत आणि सौहार्दपूर्ण आहे. भारत नेहमीच बांग्लादेशची मदत करत राहिला आहे. कोरोना संकटादरम्यान भारताने बांग्लादेशला मदत करुन आणखी एक उदाहरण घालून दिलं आहे. 

2020 मध्येच शेख हसीना सोबत झालेल्या व्हर्च्यूअल समिटच्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी बांग्लादेश दौऱ्याची घोषणा केली होती. या दौऱ्यासंदर्भातच जानेवारी 2021 मध्ये बांग्लादेशचे परराष्ट्र सचिव मसूद बिन मोमेन भारतात आले होते. तर आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर देखील गेल्या काही दिवसांपूर्वी बांग्लादेशच्या दौऱ्यावर गेले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT