Shinzo Abe Narendra Modi esakal
देश

शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्यावर मोदींची प्रतिक्रिया, एकत्र केली होती गंगारती

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार, प्रकृती गंभीर

सकाळ डिजिटल टीम

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

जपानचे (Japan) माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. जपानच्या नारा शहरात शिंजो आबे भाषण करत असताना बंदुकीची गोळी झाडल्यासारखा आवाज आला आणि ते खाली कोसळले.

एनएचके चॅनलच्या रिपोर्टरनं गोळीचा आवाज ऐकू आल्याचं म्हटलंय. शिंजो आबे खाली पडल्यानंतर ते रक्तबंबाळ झाल्याचं दिसलं. त्यामुळं गोळीबारातच शिंजो आबे जखमी झाले असावेत, असं वृत्त समोर येत आहे. माजी पंतप्रधानांवर खुलेआम गोळ्या झाडण्याच्या घटनेनं सर्वांनाच धक्का बसलाय. या घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील दुःख व्यक्त केलंय. मोदींनी ट्विटमध्ये लिहिलंय, मित्र.. आबे शिंजो यांच्यावर झालेल्या हल्ल्यानं मी खूप दुःख झालोय. आमचे विचार आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आहेच. शिवाय, आम्ही त्यांचे कुटुंबीय आणि जपानच्या लोकांसोबतही आहोत, असं त्यांनी नमूद केलंय. पंतप्रधान मोदींसोबतच जगातील विविध नेत्यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका फेसबुक पोस्टमध्ये तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग-वेन (Tsai Ing-wen) म्हणाल्या, 'माझा विश्वास आहे की, प्रत्येकजण माझ्याइतकाचं दुःखी आहे. तैवान आणि जपान हे दोन्ही लोकशाही देश आहेत. माझं सरकार अशा घटनांचा जाहीर निषेध करतं. माजी पंतप्रधान आबे हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी अनेक वर्षांपासून तैवानला पाठिंबा दिलाय. त्यामुळं तैवान-जपान संबंध दृढ झालेत. प्रगतीला चालना देण्यासाठी त्यांनी कोणतीही कसर सोडली नाहीय.'

शिंजो आबे-पंतप्रधान मोदींनी एकत्र केली होती गंगा आरती

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी यांच्याशी घट्ट स्नेह आहे. वाराणसीच्या विकासात मोठी भूमिका बजावणारे शिंजो आबे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत वाराणसीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी मोदींसोबत गंगा आरतीही केली. वाराणसी भेटीपासून भारत आणि जपानमधील राजनैतिक संबंधांना मजबूत राजनैतिक आधार मिळालाय.

शिंजो आबे हे देखील पंतप्रधान मोदींना आपले प्रिय मित्र मानतात. आबे यांनी वाराणसीच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींना जवळून पाहिलंय. शिंजो आबे हे पंतप्रधान मोदींचे खास मित्र आहेत. जेव्हा-जेव्हा हे दोन मुत्सद्दी दीर्घकाळ भेटतात, तेव्हा अनेकांना त्यांच्या मैत्रिची खात्री पटते. शिंजो आबे पंतप्रधान म्हणून भारतात आले, तेव्हा मोदींनी त्यांना वाराणसी दर्शनासाठी नेलं होतं. यावेळी दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी एकत्र गंगा आरती केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Marathi Bhasha Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

SCROLL FOR NEXT