PM Narendra Modi ANI
देश

लाल टोपीवाल्यांना फक्त लाल दिव्याशी देणं-घेणं : पंतप्रधान नरेंद्र मोदी

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशात असून त्यांनी जवळपास ९ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन केले.

लखनऊ - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उत्तर प्रदेशात असून त्यांनी जवळपास ९ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन केले. यामध्ये खताचा कारखाना, एम्स, बाबा राघव दास मेडिकल कॉलेजच्या आरएमआरसी इत्यादींचे लोकार्पण करण्यात आले. खताच्या कारखान्याचे उद्घाटन करताना मोदी म्हणाले की, आम्ही आधीच्या सरकारमधील दिवस पाहिले आहेत. तेव्हा धान्य असतानासुद्धा गरिबांना धान्य मिळत नव्हतं. आज आम्ही गरिबांसाठी धान्याची गोदामं उघडली आहेत. पीएम अन्न योजनेचा कालवधी वाढवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीकासुद्धा केली. त्यांनी म्हटलं की, आधीच्या सरकारने गोरखपूरमध्ये एम्ससाठी जमीन देताना वेळ घालवला. खूप दबाव टाकल्यानंतर एम्ससाठी जमीन दिली गेली. कोरोनाच्या संकटातसुद्धा विकासाचं काम डबल इंजिन सरकारने थांबू दिलं नाही. लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांचे संस्कार विरोधक विसरले असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.

उत्तर प्रदेशातील जनतेला माहिती आहे की लाल टोपी वाल्यांना फक्त लाल दिव्याशी देणं घेणं आहे. त्यांना फक्त सत्ता हवीय. दहशतवाद्यांना अभय देण्यात आणि त्यांना तुरुंगातून सोडवण्यासाठी सत्ता हवीय. लाल टोपीवाले यूपीसाठी धोक्याचा इशारा असल्याचंही मोदींनी म्हटलं.

आधी गोरखपूरमध्ये फक्त एक मेडिकल कॉलेज होतं. लोकांना उपचारासाठी बनारस आणि लखनऊला जावं लागत होतं. जेव्हा तुम्ही आम्हाला सेवेची संधी दिलीत तेव्हा एम्स उभा राहिलं. रिसर्च सेंटरची स्वत:ची बिल्डिंगसुद्धा तयार आहे असं मोदींनी या उद्घाटन समारंभावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT