Narendra Modi  
देश

Narendra Modi : देशातील कानाकोपऱ्यातील आदिवासींसोबत कित्येक दिवस घालवले; PM मोदींचं विधान

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर राष्ट्रीय जनजाती महोत्सवच्या 'आदि महोत्सवा'चे उद्घाटन झाले. यावेळी आदिवासी समाजातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आदिवासींच्या जीवनशैलीने मला खूप काही शिकवले आहे. (pm narendra modi inaugurates aadi mahotsav at major dhyan chand stadium )

देशाच्या कानाकोपऱ्यातील आदिवासी समाज आणि कुटुंबासोबत मी अनेक आठवडे घालवले आहेत. आदिवासींच्या परंपरा मी जवळून पाहिल्या आहेत, त्यांच्याकडून शिकलो आहे आणि जगलो आहे. आदिवासींच्या जीवनशैलीने मला देशाचा वारसा आणि परंपरांबद्दल बरेच काही शिकवले, असंही मोदी म्हणाले.

जागतिक व्यासपीठांच्या माध्यमातून भारत आदिवासी परंपरेला आपला वारसा आणि अभिमान म्हणून सादर करतो. भारत जगाला सांगतोय की, हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग सारख्या आव्हानांवर उपाय हवे असतील तर आदिवासींची जीवनपरंपरा बघा, मार्ग सापडेल.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, अर्थसंकल्पात पारंपारिक कारागिरांसाठी पीएम-विश्वकर्मा योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पीएम-विश्वकर्मा अंतर्गत तुम्हाला आर्थिक मदत, कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. आपल्या उत्पादनाच्या विपणनासाठी सहकार्य केले जाईल. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT