health news international nurses day 2022 Prime Minister Narendra Modi Pride of service-oriented work of the nurses e sakal
देश

PM मोदी परदेशी दौऱ्यानंतर भारतात, संसदेच्या नव्या इमारातीच्या उद्घाटनावरून निर्माण झालेल्या वादावर म्हणाले...

तीन दिवसांच्या परदेश दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले

अंकिता खाणे (Ankita Khane)

परदेशी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले आहेत. पालम विमानतळावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांनी मोदींच्या स्वागतासाठी पोहचले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सत्ताधारी आणि विरोधक, या दोघांनीही भारताचा सत्कार केला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

तर देशातील संसदेच्या नव्या इमरातीच्या उद्घाटनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यावर पंतप्रधान मोदींनी सूचक वक्तव्य केलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना तेथील सत्ताधारी आणि विरोधक,या दोघांनीही भारताचा सत्कार केला असं नरेंद्र मोदी म्हणालेत.

देशाबाबत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले कि, गुलामीच्या मानसिकतेत बुडून जाता कामा नये. मी जगातील देशांमध्ये जातो तेथे जगातील अनेक मोठ्या व्यक्तींना भेटतो. त्यावेळी मी नव्या भारताच्या क्षमतेबद्दल बोलतो. माझ्या देशाच्या महान संस्कृतीचा गौरव करताना त्याबद्दल बोलताना मी ताठ मानेने बोलतो. हे सगळं करण्याचे सामार्थ्य माझ्यामध्ये आहे. कारण तुम्ही बहुमताचे सरकार बनवले आहे. जेव्हा मी जगभरात जातो त्यावेळी मी 140 कोटी भारतीय नागरिकांचे प्रतिनिधित्व करतो अंसही ते म्हणालेत.

मोदी तीन देशांच्या दौऱ्यानंतर भारतात परतले आहेत. सकाळी ५.१० च्या सुमारास त्यांचे विमान दिल्लीतील पालम विमानतळावर उतरले. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाजपचे शेकडो कार्यकर्ते विमानतळाबाहेर रात्रभर उभे होते. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाजपच्या दिल्ली राज्य युनिटने विमानतळाबाहेर जल्लोष केला.

भाजपचे अनेक कार्यकर्ते हातात तिरंगा आणि ‘जगाचा आवडता नेता’ असे पोस्टर घेऊन उभे होते. मोदी तीन देशांच्या अधिकृत दौऱ्यानंतर भारतात परतले आहेत. पंतप्रधान मोदी जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले होते. गेल्या सहा दिवसांत पंतप्रधानांनी या तिन्ही देशांमध्ये अनेक बैठका घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT