PM Modis Mann Ki Baat esakal
देश

Mann Ki Baat Episode : अवयवदानासाठी पुढे यावं, त्यासाठी कोणतीही अट नाही; PM मोदींचं आवाहन

आपल्या देशात चॅरिटीला इतकं उच्च स्थान देण्यात आलंय की, लोक इतरांच्या आनंदासाठी आपलं सर्वस्व दान करण्यास मागंपुढं पाहत नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

आज आपल्या तिन्ही सैन्यात देशाच्या कन्या शौर्याचा झेंडा फडकावत आहेत.

PM Modi Mann Ki Baat : 2013 मध्ये आपल्या देशात अवयवदानाची 5 हजारांहून कमी प्रकरणं होती, पण 2022 मध्ये ही संख्या 15 हजारांहून अधिक झाली आहे. ज्या व्यक्तींनी अवयव दान केलं, त्यांच्या कुटुंबीयांनी खरोखरच मोठं कार्य केलंय, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमात व्यक्त केलं.

आपल्या देशात असे अनेक लोक आहेत, जे आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी आपली संपूर्ण पेन्शन खर्च करतात. तर, काहीजण आपल्या आयुष्याची संपूर्ण कमाई पर्यावरण आणि प्राण्यांच्या सेवेसाठी समर्पित करतात, असंही मोदी म्हणाले.

आपल्या देशात चॅरिटीला इतकं उच्च स्थान देण्यात आलंय की, लोक इतरांच्या आनंदासाठी आपलं सर्वस्व दान करण्यास मागंपुढं पाहत नाहीत. आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या युगात अवयवदान हा एखाद्याला जीवन देण्याचा उत्तम मार्ग आहे, असंही मोदींनी सांगितलं.

पंतप्रधान पुढं म्हणाले, अवयवदानाची सर्वात मोठी भावना ही आहे की, जाता-जाता कोणाचा तरी जीव वाचला पाहिजे. अवयवदानाची वाट पाहणाऱ्यांना प्रतिक्षेतील प्रत्येक क्षण कसा जातो, हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. ही प्रतीक्षा वेळ खूप कठीण आहे. अशा स्थितीत दाता मिळाला तर त्यांना भगवंताचंच रूप दिसतं. 'मन की बात'मध्ये झारखंडच्या रहिवासी असलेल्या स्नेहलता चौधरीचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले, 'तिनं देव बनून इतरांना जीवन दिलं. तिनं तिचं हृदय, किडनी आणि यकृत दान केलं.'

‘मन की बात’मध्ये लष्करातील महिलांबाबत पंतप्रधान म्हणाले, 'आज आपल्या तिन्ही सैन्यात देशाच्या कन्या शौर्याचा झेंडा फडकावत आहेत. स्त्रीशक्तीची ही ऊर्जा विकसित भारताची जीवनवाहिनी आहे. सौरऊर्जेच्या क्षेत्रात भारत ज्या वेगानं पुढं जात आहे, ती स्वतःच मोठी उपलब्धी आहे. भारतातील लोकांचं शतकानुशतके सूर्याशी विशेष नातं आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT