MODI_man_ki_bat 
देश

मोदींनी  'मन की बात'मध्ये उल्लेख केलेले ब्राझीलचे जॉनस कोण आहेत? जाणून घ्या

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM narendra modi) यांनी रविवारच्या मन की बात (Mann ki Baat) कार्यक्रमात भारतीय संस्कृती, शास्त्र-पुराणे आणि वेदांचे महत्व आणि गौरवशाली इतिहासाची चर्चा केली. यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी ब्राझीलच्या जॉनस यांचा उल्लेख केला. जॉनस यांना भारतीय संस्कृती इतकी भावली की त्यांनी आपला सर्व व्यवसाय सोडून पूर्णवेळ अध्यात्मासाठी देण्याचा निर्णय घेतला. विदेशात अनेक विद्वान झाले आहेत, ज्यांनी भारतीय संस्कृती आणि वेदांनी प्रभावित होऊन यासाठीच आपले सर्वस्व वाहिली आहे. जॉनस त्यापैकीच एक आहेत.

पंतप्रधान मोदी कार्यक्रमात म्हणाले की, जॉनस यांनी  Mechanical Engineering ची पदवी घेतल्यानंतर स्टॉक मार्टेकमध्ये (stock market) आपली कंपनी बनवली आणि आपला व्यवसाय सुरु केला. व्यवसाय चांगला चालत होता. पण, त्यानंतर त्यांचा रस भारतीय संस्कृती आणि खासकरुन वेदांमध्ये निर्माण होत गेला. त्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आणि पूर्णवेळ अध्यात्माला देण्याचा निर्णय घेतला.  Stock पासून Spirituality  पर्यंतच्या जॉनस याच्या प्रवासाला पंतप्रधान मोदी यांनी अनुकरणीय म्हटलं आहे. 

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, जॉनस यांनी भारतात वेदांत दर्शनचा अभ्यास केला आणि 4 वर्षापर्यंत ते कोयंबतूरच्या आर्ष विद्या गुरुकुलम मध्ये अध्ययन करत राहिले. जॉनस यांच्यात विशेषता होती की ते आपल्या संदेशांचा प्रचार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत होते. ते नियमितपणे ऑनलाईन कार्यक्रम (online programmes) घेतात आणि वेदांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करतात. ते प्रतिदिन पॉडकास्ट (Podcast) करतात आणि हजारो लोक त्यांचा संदेश नियमितपणे ऐकून प्रभावित झाले आहेत. 

100 वर्षांपूर्वी चोरी झालेल्या अन्नपूर्णेच्या मुर्तीबाबतही मोदींनी भाष्य केलं. मन कि बात मध्ये बोलताना मोदी म्हणाले की, आज मी सर्वांना एक आनंदाची बातमी देणार आहे. ही बातमी ऐकून प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटेल. देवी अन्नपूर्णाची एक खूप जुनी मूर्ती भारतातून चोरण्यात आली होती. ती 1913 साली वाराणसीतील एका मंदिरातून चोरून देशाबाहेर नेण्यात आली होती. मात्र, ती परत भारतात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे तसेच कॅनडा सरकारचे मी आभार मानतो.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT