Sharad Pawar, Narendra Modi 
देश

पवार-मोदी बैठकीत काय झाली चर्चा? पत्रकार परिषदेत पवारांनी दिली माहिती

शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील बैठकीतील चर्चेची माहिती शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांची दिल्लीत आज बैठक पार पडली. या बैठकीत त्यांच्यामध्ये जवळपास वीस मिनिटं चर्चा झाली. पण या चर्चेत नक्की कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Sharad Pawar PM Narendra Modi meeting details during press conference)

पवार म्हणाले, "लक्षद्वीपच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. महाराष्ट्रातील कारवायांसदर्भात पंतप्रधान मोदींशी कुठलीही चर्चा झाली नाही. संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला. राऊत हे राज्यसभेचे सदस्य आहेत, त्यांच्यावर अन्याय झाला असून या कारवाईची गरजच काय होती? यामुद्द्यांसह राज्यातील विधानपरिषदेच्या बारा आमदारांच्या प्रलंबित नियुक्त्यांवर या बैठकीत चर्चा झाली"

दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांच्यावरील कारवाईसंबंधी यावेळी कुठलीही चर्चा झाली नसल्याचंही यावेळी पवारांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच कधीच भाजपसोबत नव्हती. राष्ट्रवादी आणि शिवसेना सध्या भाजपविरोधात उभी आहे, असं सांगत त्यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडी सरकारचं चांगलं सुरु अशी ग्वाही देखील शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT