Indian Economy sakal
देश

PM Modi : भारत खरंच तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या 'गॅरंटी'मध्ये किती तथ्य?

भारत लवकरचं जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार, पंतप्रधान मोदींनी दिली होती गॅरंटी

सकाळ डिजिटल टीम

PM Modi on Economy:पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भारत त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात जगातील टॉप-३ अर्थव्यवस्थांमध्ये सामील होईल. ते बुधवारी (दि.२६ जुलै) म्हणाले की ही मोदीची गॅरंटी आहे. प्रधानमंत्र्यांच्या या विधानावर अर्थतज्ञांनी आपले मत व्यक्त केले आहे.

अशात प्रश्न निर्माण होतो की केव्हापर्यंत भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनू शकते? मागच्या नऊ वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था कुठपर्यंत आली. याबद्दल जाणून घेऊयातं..

काय म्हणाले मोदी?

दिल्लीमधील प्रगती मैदानावर बुधवारी पुनर्विकसित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी आणि संमेलन केंद्र 'भारत मंडपम'चं उद्धाटन करताना नरेंद्र मोदी म्हणाले की २०१४मध्ये सत्तेत आल्यापासून पूर्ण देशाने त्याच्याकडून आणि सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाचा परिणाम बघत आहे.

आमच्या पहिल्या कार्यकाळाच्या सुरुवातीला भारत जगातील अर्थव्यवस्थांमध्ये दहाव्या स्थानावर होता. दुसऱ्या कार्यकाळात भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. यावेळी मोदींना जनतेला विश्वास दर्शवला की आमच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील सर्वोच्च तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल आणि ही मोदीची गॅरंटी आहे.

२०१४पासून आतापर्यंत काय-काय बदल झाला?

२०१४मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेत आले, तेव्हा भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगातील दहावा देश होता. तेव्हा देशाचा जीडीपी दोन ट्रिलियन डॉलरच्या जवळपास होता. २०२३मध्ये या आकड्यांवर नजर टाकली तर हा जीडीपी ३.७५ ट्रिलियनपर्यंत पोहोचलाय. आता भारत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

२०२५पर्यंत केंद्रसरकारने जीडीपी ५ ट्रिलियनपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष्य ठेवलंय. मात्र, कोरोना, रशिया-युक्रेन युद्ध आणि जागतिक बाजारपेठेतील मंदीमुळे जीडीपी विकास दर मंदावला.

मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात भारताने जगातील पाच मोठ्या देशांना मागे टाकलंय. आता भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताने या नऊ वर्षात ब्रिटन, रशिया, फ्रान्स, कॅनडा आणि इटलीसारख्या देशांना मागे टाकलंय.

आता भारताच्या पुढे पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या क्रमांकावर जपान आणि चौथ्या क्रमांकावर जर्मनी आहे.

भारत केव्हा होईल जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ?

याबद्दल अनेक अहवाल प्रकाशित झाले आहेत. यापैकी अमेरिकन इन्वेस्टमेंट बॅंक मॉर्गन स्टॅनलीच्यानुसार, २०२७पर्यंत भारत जपान आणि जर्मनीला मागे टाकतं जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. २०३१पर्यंत भारताचा जीडीपी ३.७५ ट्रिलियनवरुन ७.५ ट्रिलियन होईल.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेचा अहवालही याला दुजोरा देत आहे. आयएमएफचा अंदाज आहे की, २०२७पर्यंत भारताचा जीडीपी ५.४ ट्रिलियन होईल. अमेरिकन इन्वेस्टमेंट बॅंक गोल्डमॅन सॅकचाही एक अहवाल आला होता,ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की २०७५ पर्यंत अमेरिकेला मागे टाकतं भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. तोपर्यंत चीन जगातील सर्वांतील मोठी अर्थव्यवस्था बनेल.

अर्थतज्ञ काय सांगतात?

अर्थतज्ञ प्रल्हाद म्हणाले की, "मागच्या काही वर्षांपासून आर्थिक मंदी वाढली आहे. कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेतही मंदी बघायला मिळाली. यामुळे काही देशांची अर्थव्यवस्था वाढण्याच्या ऐवजी खाली चालली आहे.जर आकडेवारीवर नजर टाकली तर ब्रिटनचा ३ टक्के,फ्रान्सचा २ टक्के तर रशिया फक्त १ टक्क्याने जीडीपी वाढवू शकला आहे. ब्राझील देशाचा जीडीपी तर १५ टक्क्यांनी खाली गेला.ज्यावेळी जगातील काही मोठ्या देशांच्या जीडीपीची वाईट अवस्था होती, तेव्हा भारत पुढे आला. हा एक चांगला संकेत आहे. भारताची उत्पादन क्षमता वाढली आहे."

ते म्हणाले की,"२०१४च्या तुलनेत यामध्ये वाढ झाली आहे,पण आपण अजूनही खुप मागे आहोत. २०१४मध्ये एका व्यक्तीचे दरसाल उत्पन्न अंदाजे ८० हजार इतके होते, जे आता वाढून १.७० लाख झाले आहे. मात्र, ८० कोटी लोक असे आहेत, ज्यांना सरकार गरिब समजते."

पुढे प्रा.प्रल्हाद म्हणाले की, "भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढतं आहे. अशा परिस्थितीत मजबूत जीडीपीबरोबरचं प्रत्येक व्यक्तीमागे उत्पन्न देखील वाढले पाहिजे. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT