pm Narendra modi on ferozepur security breach says any statement i make will impact investigation  
देश

सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी PM मोदी म्हणाले, 'माझे कोणतेही विधान..'

सकाळ डिजिटल टीम

देशात लवकरत पंजाबसह इतर पाच राज्यांमध्ये निवडणुक होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर राजकारण दिवसेंदिवस तापत आहे. या विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर आज आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ANI या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये पंतप्रधानांनी अनेक विषयांवर भाष्य केलं असून त्यांनी पंजाबमधील फिरोजपूरमधील त्यांच्या सुरक्षेत त्रुटी प्रकरणाबाबत (PM Modi Security Breach) प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी या प्रश्नावर बोलणे टाळले. (PM Narendra Modi on Security Breach)

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी या मुद्द्यावर मौन पाळले आहे, सर्वौच्च न्यायालय या प्रकरणाकडे गांभिर्याने पाहात आहे यासंदर्भात जे काही विधान केलं तर त्याचा तपासावर परिणाम होईल आणि ते योग्य नाही. न्यायव्यस्थेवर विश्वास व्यक्त करताना मोदी म्हणाले की, काहीही असो सर्वोच्च न्यायालयाची समिती देशासमोर सत्य आणेल, तोपर्यंत वाट पाहावी असे देखील मोदी यावेळी म्हणाले.

दरम्यान ६ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या पाच सदस्यीय समितीने पहिल्यांदाच या प्रकरणाच्या तपासासाठी फिरोजपूर येथे घटनास्थळाला भेट दिली होती. या प्रकरणाची चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली १२ जानेवारी रोजी समिती स्थापन केली होती.

गेल्या महिन्यात पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीनंतर केंद्र आणि पंजाब सरकारने स्वतंत्र तपास सुरु केला होता. पंजाबने निवृत्त न्यायमुर्ती मेहताब सिंग गिल आणि गृह सचिव अनुराग वर्मा यांची समिती स्थापन केली. तर केंद्राने सुरक्षा सचिवांच्या अध्यक्षतेखाली इंटेलिजन्स ब्युरो आणि एसपीजी अधिकाऱ्यांची चौकशी समितीही स्थापन केली आहे. केंद्रिय समितीने यापूर्वीच तपास सुरु केला होता त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही समित्या बरखास्त केल्या आणि निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त चौकशी समिती स्थापन करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT