PM Narendra Modi, President Ramnath Kovind tributes to Rahul Bajaj 
देश

"भारतीय उद्योगाचा नायक हरपला"; पंतप्रधानांनी व्यक्त केल्या भावना

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind)यांनीही राहुल बजाज (Rahul Bajaj) यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचं आज पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्या या निधनानंतर विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून प्रतिक्रिया येत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनीही राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मभूषण पुरस्कार विजेते उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

"श्री राहुल बजाजजी वाणिज्य आणि उद्योग जगतातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी स्मरणात राहतील. व्यवसायाच्या पलीकडे त्यांना समाजसेवेचीही आवड होती आणि त्यांच संवादकौशल्य उत्तम होतं. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांच्या संवेदना, ओम शांती." या शब्दात पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली. (PM Narendra Modi, President Ramnath Kovind tributes to Rahul Bajaj)

"श्री राहुल बजाज यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. भारतीय उद्योगाचे ते नायक होते. त्याच्या . त्यांची कारकीर्दीचा परिणाम देशाच्या कॉर्पोरेट क्षेत्रावरही झाला त्यांच्या निधनाने उद्योग जगतात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना." या शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT