PM Modi 
देश

दुकानात चहा थोडासा थंड असला तरी लोक कानाखाली मारायचे, लहानपणी खूप अपमान सहन केला- PM मोदी

PM Modi said about his childhood : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं आहे. त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यात शेकडो सभा घेतल्या आहेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- राजकारणात आल्यापासून नाही तर लहानपणापासूनच मला अपमानाचे आयुष्य जगावे लागले आहे. त्यामुळे माझ्यात खूप सहनशीलता आली आहे. लहानपणी मी कप-प्लेट धुवायचो. आमचं छोटंसं दुकान होतं, तिथे येणारा कोणीही माझ्यावर भडकायचा. दुकानात चहा थोडासा जरी थंड असला तरी लोक मला कानाखाली मारायचे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी विरोधकांवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, 'आम्ही कामदार आहोत, तर ते नामदार आहेत. आम्ही काम करतो. त्यामुळे आम्हाला शिव्या-शाप आणि अपमान सहन करावा लागतो. पण, मला आता याची सवय झाली आहे. कारण, लहानपणापासून मी अशा गोष्टींना सामोरे जात आहे.'

ईडी-सीबीआयवर भाष्य

ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवर पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केलं. यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात ईडीने ३४ लाख जप्त केले होते, पण, २०१४ ते २०२४ च्या काळात ईडीने २२०० कोटी रुपये जप्त केले आहेत. लोकांनी नोटांचा ढिगारा पाहिला आहे. इतके पैसे आहेत की ते घेऊन जायला अनेक टेम्पो लागतील. अशा लोकांना सोडलं जाणार नाही. मोठे लोक तुरुंगात गेले आहेत. ज्यांनी पाप केलं आहे, त्यांना शिक्षा भोगावी लागणार आहे, असं मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं आहे. त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यात शेकडो सभा घेतल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याची पूर्ण तयारी केली असल्याचं दिसत आहे. कारण, त्यांनी यासंदर्भात तयारी देखील केली आहे. निवडणूक जिंकल्यानंतर काय करायचं याचा प्लॅन देखील मोदींकडे तयार आहे.

दरम्यान, देशात लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान सुरु आहे. सध्या सहा टप्प्यातीत मतदान पार पडले आहे. सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया १ जून रोजी पार पडणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी होईल. या दिवशी देशाच्या जनतेने कोणाच्या बाजूने कौल दिला हे स्पष्ट होईल. तूर्तास, भाजपने चारशे पारचा नारा दिला आहे. दुसरीकडे, इंडिया आघाडीने मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत अशी भविष्यवाणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार लाल! ऑटो सेक्टरला मोठा फटका; Corona Remedies IPO कडे गुंतवणूकदारांचे लक्ष

'...म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अजरामर आहे'; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी महाराजांबद्दल काय सांगितलं?

IND vs SA 3rd T20I: १२,५,१२ धावा करणारा सूर्यकुमार यादव म्हणतो, मी आऊट ऑफ फॉर्म नाही, मी नेट्समध्ये चांगली फलंदाजी करतोय...

Ajit Pawar: तिजोरी ओसंडून वाहत नाही! सरसकट गोवंश अनुदानावरून अजित पवारांचा टोला

कांतारा चॅप्टर १ नंतर रुक्मिणी वसंत बॉलीवूडमध्ये झळकणार? अभिनेत्री म्हणाली...‘मी खूप …’

SCROLL FOR NEXT