All Party meet 
देश

सर्वपक्षीय बैठकीला मोदींची दांडी; कृषी कायद्यांबाबत काँग्रेसला शंका!

उद्यापासून सुरु होतंय संसदेचं हिवाळी अधिवेशन

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : उद्यापासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चेचा अजेंडा काय असेल यासाठी केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दांडी मारली. या बैठकीला विरोधी पक्षांचे महत्वाचे नेते उपस्थित होते. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे, अधिर रंजन चौधरी आणि आनंद शर्मा हे काँग्रेसकडून तर सुदिप बॅनर्जी आणि देरेक ओब्रियन हे तृणमूल काँग्रेसकडून तर टीआर बाळू आणि टी. सिवा डीएमकेकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार उपस्थित होते.

मोदींच्या अनुपस्थितीबद्दल खर्गे म्हणाले, "आम्हाला आशा होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या बैठकीला हजर राहतील. पण काही कारणांमुळे ते हजर राहू शकले नाहीत. सरकारनं कृषी कायदे मागे घेतले पण पतंप्रधानांनी हे जाहीर करताना म्हटलं होतं की, आम्ही या कायद्याचं महत्व शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही. त्यामुळं हेच कायदा भविष्यात पुन्हा वेगळ्या मार्गाने पुन्हा आणले जाऊ शकतात"

यावेळी विरोधकांनी मागणी केली की, ज्या घरामध्ये कोविडच्या काळात प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाला, अशा पीडितांना ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच यावेळी संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, ३१ पक्ष आणि ४२ नेते या सर्वपक्षीय बैठकीला हजर झाले होते. लोकसभा अध्यक्षांनी परवानगी दिली तर सरकार कुठल्याही प्रश्नावर चर्चेसाठी तयार आहे.

यंदाच्या हिवाळी अधिवेशनात सर्वांच्या नजरा या कृषी कायदे रद्द केल्याच्या निर्णयाकडे आहे. याद्वारे गेल्या वर्षभरापासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विरोधकांनी देखील यावर चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे. सरकारनंही सांगितलंय की, अधिवेशन सुरु होताच पहिल्याच दिवशी याला मंजुरी दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT