देश

संकटात संधी शोधण्याचे आवाहन; मोदींची उद्योगजगताला साद 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली  -‘‘ कधी कधी काळ देखील आमची परिक्षा घेतो. एकाच वेळी अनेक संकटे येतात. मात्र प्रत्येक संकट आमचे कर्तुत्व उजळून टाकून उज्ज्वल भविष्याची हमी देते. सध्याच्या संकटालाही आत्मनिर्भरतेच्या मार्गावरून प्रगतीच्या संधीत रूपांतरित केले पाहिजे,’’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्योग जगताला दिलासा दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (ICC) च्या ९५ व्या वर्धापनदिन सोहळ्याचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद् घाटन करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. या महासंकटातही कोट्यावधी देशवासीयांच्या चेहऱ्यावर दिसणारी संकल्पशक्ती ही नवी ऊर्जा देणारी आहे असे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे आलेल्या मंदीच्या वादळात पंतप्रधानांनी उद्योग क्षेत्राला दुसऱ्यांदा हा दिलासा दिला आहे. यापूर्वी त्यांनी ‘कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’च्या (सीआयआय) सभेला संबोधित केले होते. 

पंतप्रधान म्हणाले की, ‘‘ गेल्या पाच ते सहा वर्षांत देशाची नीती आणि रीती यामध्ये आत्मनिर्भरता हेच सर्वात महत्त्वाचे लक्ष्य ठेवण्यात आले . कोरोनातून मिळालेला धडा हा आहे की आतापर्यंत आयात करत असलेली प्रत्येक गोष्ट आता देशातच कशी बनेल आणि पुढे चालून तीच गोष्ट भारत निर्यात कशी करू शकेल यादृष्टीने वेगाने प्रयत्न होणे गरजेचे आहेत. शेतकऱ्यांसाठी नुकतेच जे काही निर्णय घेतले, त्यामुळे कृषी अर्थव्यवस्था वर्षानुवर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाली. आता आमचा शेतकरी देशात कोठेही त्याला हवे तेथे आपला शेतमाल विकू शकतो. त्याची बंधने आता नष्ट झाली आहेत.’’ 

क्लस्टरबेस्ड ॲप्रोचचे कौतुक 
‘‘ बांबू आणि सेंद्रिय उत्पादनांसारख्या स्थानिक उद्योगांसाठी “ क्लस्टरबेस्ड अॅप्रोच” मुळे उद्योजकांसाठी एकाच वेळी अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. ज्या जिल्ह्यात ज्या वस्तूंचे प्रामुख्याने उत्पादन होते. त्याच्याच आसपास आता पूरक उद्योगांची क्षेत्रे विकसित केली जातील. भारतीय अर्थव्यवस्थेला जास्तीत जास्त स्वावलंबी बनवण्यासाठी आणि आयातीवरचे अवलंबित्व झपाट्याने कमी करण्यासाठी सरकारच्या निर्णयांना उद्योगक्षेत्र निश्चित साथ देईल असा मला विश्वास आहे, ’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोदी उवाच 
-विजय आणि पराभव पूर्णपणे मनावर अवलंबून 
-आधीच पराभव मानणाऱ्यांना कमी संधी मिळतात 
-आमची इच्छा आणि संकल्पशक्ती हीच पुढील मार्ग प्रशस्त करते 
- बंगाल जो विचार आज करतो तोच विचार देश उद्या करतो 
- कोलकत्ता पुन्हा एकदा पूर्व भारताचे नेतृत्व करू शकतो. 
- केवळ एलईडी बल्बमुळे १९,००० कोटी रुपयांची बचत 
- छोट्या व्यापाऱ्यांकडून वस्तू घेतल्याने त्यांचा उत्साह वाढतो 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Sadabhau Khot Education : 'नीट विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी आतंकवादी'; असे म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचे शिक्षण झाले तर किती?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

SCROLL FOR NEXT