देश

PM मोदी झेलेन्स्की आणि पुतिन या दोघांशीही साधणार फोनवरुन संवाद

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आज रशियाा-युक्रेन या दोन्ही देशात सुरु असलेल्या युद्धाचा आज १२ वा दिवस आहे. या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या चर्चेची आज तिसरी फेरी पार पडणार आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की तसेच रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशीही फोनवर बोलणार आहेत. याबाबतची माहिती भारत सरकारमधील सूत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे याआधीच युक्रेनने रशियासोबत सुरु असलेलं युद्ध लवकरात लवकर थांबवलं जावं, यासाठी पुन्हा एकदा भारताकडे विनंती केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधणार आहेत. दुसरीकडे, आज पुन्हा रशियानं तात्पुरता युद्धविराम घोषित केला आहे. याबाबत स्पुटनिकने माहिती दिली आहे. यापूर्वी रशियानं काही तासांसाठी युद्धा थांबवण्याची घोषणा केली होती.

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची समजूत घालण्यासाठी आणि त्यांच्याशी बातचित सुरु ठेवण्याचं आवाहन केलं होतं. दिमित्रो कुलेबा यांनी म्हटलंय की, भारतामधील रशियन दुतावासावर दबाव तयार करुन रशियाला युद्ध थांबवण्याबाबतची मागणी केली जाऊ शकते.

युक्रेन फक्त आणि फक्त या कारणास्तव लढत आहे कारण आमच्या हल्ला करण्यात आला आणि आम्हाला फक्त आपल्या जमिनीचे संरक्षण करायचे आहे. पुतिन आमच्या अस्तित्वाचा अधिकार मान्य करत नाहीयेत. भारतासोबत विशेष संबंध असणारे सर्वच देशांचे प्रमुख पंतप्रधान मोदींना विनंती करु शकतात की त्यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी संवाद साधणं सुरु ठेवावं आणि त्यांना समजवावं की हे युद्ध कुणाच्याच हिताचं नाहीये. रशियाचे बहुतांश लोकदेखील या युद्धामध्ये कसलंही स्वारस्य ठेवत नाहीत, असंही युक्रेनने म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Weather Update: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यभर हवामानाचा बदलता अंदाज, ११ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Chuda Matar Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट अन् हेल्दी मेन्यू! कमी वेळात बनणाऱ्या 'बनारसी पोह्या'ची पाहा सोपी रेसिपी

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

SCROLL FOR NEXT