PM Narendra Modi visits Hunar Hatt and had lunch of Litti Chokha
PM Narendra Modi visits Hunar Hatt and had lunch of Litti Chokha 
देश

मोदींनी घेतला लिट्टी चोखा अन् कुल्लड चहाचा मनसोक्त आस्वाद!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच काहीतरी हटके गोष्टी करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. काल (ता. १९) संध्याकाळी त्यांनी नवी दिल्लीतील जनपथ येथे लागलेल्या 'हुनर हट' येथे हजेरी लावली. तिथे लागलेल्या सर्व स्टोल्सला त्यांनी भेच दिली. पण एका खाण्याच्या स्टॉलवर त्यांनी असं काही केलं की, सगळे बघतच राहिले!

मोदींनी काल संध्याकाळी हुनर हटमध्ये हजेरी लावली. सर्व स्टॉल्सला भेट दिली व सर्व स्टॉलवर असणाऱ्या सर्व कामगारांचा उत्साह वाढवला. येथील एका पदार्थाच्या स्टॉलवर मोदींनी चक्क लिट्टी चोखाचा आस्वाद घेतला. एवढेच नाही तर तर कुल्लडमध्ये चहा देखील घेतला. त्यांनी हे फोटोने उत्साहाने आपल्या ट्विटरवर शेअर केले आहेत. यावेळी त्यांच्यासह अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी होते.

मोदींना बघून या सर्व कारागीरांचा आनंद द्वीगुणित झाला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपवून मोदी अचानकपणे हुनर हटमध्ये पोहोचले. चित्रांचे स्टॉल, वाद्यांचा स्टॉल, खाद्य पदार्थांच्या स्टॉलला मोदींनी भेट दिली. त्यांनी या हुनर हटचे फोटो व व्हिडिओही ट्विटरवर शेअर केले आहेत. 

हुनर हट चे आयोजन अल्पसंख्यांक मंत्रालयाने केले आहे. यात देशभरातील कारागीर आपली कला घेऊन हुनर हटमध्ये आले आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT