PM Narendra Modi, India China, Ladakh,India China standoff  
देश

मोदींच्या मनात नेमकं काय सुरुय? चीनला दणका देण्याचा विचार?

सकाळ डिजिटल टीम

भारत-चीन यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीनंतर चिनी कंपन्यांच्या अ‍ॅपला बंदी घालण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला. कोरोनाजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोनदिवसांपूर्वीच मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी मोदी भारत-चीन यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीवर भाष्य करतील, अशी अपेक्षा होती. पण मोदींनी लडाखच्या सीमारेषेवरील तणावावर आणि चिनी अ‍ॅपवरील बंदीवर मौन बाळगल्याचे पाहायला मिळाले. मोदींनी या विषयावर बोलायला हवे होते, असा सूरही उमटल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भातील चर्चा रंगत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी अचानकपणे लेहमध्ये दाखल होत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून सीमारेषेवरील परिस्थितीचा आढावा घेतला.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे जनरल बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्यासोबतचा त्यांचा हा दौरा सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा असाच होता. त्यानंतर नरेंद्र मोदींनी  भारतीय जवानांना संबोधित करत त्यांचे मनोबल वाढवल्याचे पाहायला मिळाले. भारतीय सैन्याची ताकद, मोदी सरकारने लष्करी खर्चात केलेली तिप्पट वाढ हे सांगत मोदींनी अप्रत्यक्षपणे चीनची अरेरावी खपवून घेणार नसल्याचे संकेतच दिले आहेत. लेह-लडाखच्या दौऱ्यानंतर नरेंद्र मोदी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. दिल्लीमध्ये परतताच त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत तात्काळ बैठक बोलवल्याचे वृत्त आहे. या बैठकीत मोदी काही मोठा निर्णय घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जवानांशी संबोधित करताना मोदी म्हणाले की, हे जग विस्तारवादावर नाही तर विकासवादावर भरवसा ठेवणारे आहे. संपूर्ण जग विस्तारवादाच्या विरोधात आहे. यावेळी मोदींनी चीनचे नाव घेतले नसले तरी विस्तारवादाच्या विरोधात जग एकवटेल, असा सांगत त्यांनी चीनला अप्रत्यक्षरित्या धमकी वजा इशाराच दिलाय. 

भारत आणि चीन यांच्यातील तणावाला सुरुवात झाली ते 5 मे रोजीपासून सुरुवात झाली. सिक्कीमच्या पेंगोंग त्सो  परिसरात भारताकडून तयार करण्यात येत असलेल्या रस्ते बांधकामावर चीनने आक्षेप घेतला. तेथून प्रकरण लडाखपर्यंत पोहचले. पूर्व लडाखमधील फिंगर परिसर आणि गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी तंबू ठोकले. दोन्ही देशांतील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये एकमेकांच्या हद्दीतून मागे हटवण्याबाबत चर्चा सुरु असताना 15 जूनला दोन्ही देशातील लष्करी जवानांमध्ये झडप झाली. यात भाराताचे 20 जवान शहीद झाले. यावेळी 43 चिनी सैन्य मारले गेल्याचा दावाही करण्यात आला होता. चीनने मात्र याची पुष्टी केली नव्हती.   
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! पीक विम्यासाठी काय करावं? किती पैसे मिळणार? पाहा संपूर्ण गणित

Asian Games 2026: अरे आवाजsss कुणाचा... भारतीय पुरुष कबड्डी संघाने जिंकले नववे सुवर्णपदक; रोमहर्षक लढतीत इराणवर विजय

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT