देश

Chandrayaan 3 Landing: ऐतिहासिक सोहळा! PM नरेंद्र मोदी हजर असणार की नसणार? इथं वाचा...

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. अशावेळी ते चांद्रयान-३च्या लँडिंगला असणार की नसणार हा प्रश्न उपस्थित झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चांद्रयान-3 सॉफ्ट लँडिंग कार्यक्रमात सामील होतील. 15 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेच्या तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) ही तिसरी चंद्र मोहीम आहे. चांद्रयान-3 बुधवारी संध्याकाळी 6:04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. लँडर लँडिंग करण्यात यशस्वी झाल्यास, या प्रदेशात अंतराळयान सॉफ्ट-लँड करण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणत्याही देश आपले यान उतरवण्यात यशस्वी झाला नाही.

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी मंगळवारी संध्याकाळी सांगितले की चांद्रयान-3 अंतराळयान सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करण्यासाठी शेड्यूलवर आहे. स्पेस एजन्सीने सांगितले की सर्व यंत्रणा नियमित तपासण्या करत आहेत आणि लँडिंग जास्तीत जास्त सॉफ्ट व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे.

दक्षिण ध्रुवावर लँडरचे सॉफ्ट-लँडिंग हे एक आव्हानात्मक काम आहे कारण हा अतिशय खडकाळ आणि डोंगराळ प्रदेश आहे.

चंद्राचे भूगर्भशास्त्र, त्याचे जलस्रोत आणि भविष्यातील मानवी शोधाची क्षमता यांचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट असलेले चांद्रयान-३ हे १४ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. ते ५ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत दाखल झाले. या मोहिमेत लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल यांचा समावेश आहे.

सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. ते ब्रिक्सच्या परिषदेत सामील होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले आहेत. मोदी जोहान्सबर्गच्या विमानतळावर उतरल्यावर हॉटेलमध्ये त्यांचे आगमन होताचं ढोलांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

Marathi News Live Updates : दिल्लीत २५ 'अटल कॅन्टीन्स'चे उद्घाटन; ५ रुपयांत मिळणार जेवण

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

Dharur Ghat Accidents: धारूर घाटात अपघातांची मालिका कायम; जिल्हाधिकाऱ्यांच्या दुरुस्ती आदेशाला विलंब, नागरिकांमध्ये संताप

Malshej Ghat Project Protest: माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्प रद्द करण्यासाठी मढ येथे आदिवासींचा ‘गाढव मोर्चा’ व रास्ता रोको; अदानी हटाओ, सह्याद्री बचावोच्या घोषणा

SCROLL FOR NEXT