PM Narendra Modi Narendra Modi
देश

PM मोदींची सुरक्षा; सुप्रीम कोर्टात याचिका, तर पंजाबमध्ये चौकशी समिती स्थापना

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेतील त्रुटीचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे.

दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेतील त्रुटीचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. गुरुवारी यासंबंधी एक याचिका दाखल करण्यात आली असून मोदींच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर सुनावणी सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी होणार आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमणा (NV Ramanna) यांनी याचिकाकर्त्याला सांगितले की, 'केंद्र आणि पंजाब (Punjab) सरकारला याची प्रत द्या.' दुसऱ्या बाजुला पंतप्रधानांच्या दौऱ्यात उद्भवलेल्या सुरक्षेच्या परिस्थितीची आता चौकशी करण्यासाठी पंजाब सरकारने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीला तीन दिवसात अहवाल देण्यास सांगण्यात आलं आहे.

लॉयर्स व्हॉइस संघटनेकडून वरिष्ठ वकील मनिंदर सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील चुकीबद्दल सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर प्रश्न उपस्थित केला. सिंह यांनी म्हटलं की, 'अशा घटना भविष्यात पुन्हा होऊ नयेत याची काळजी घ्यायला हवी.' तसंच भटिंडामध्ये पंतप्रधानांचा ताफा रोखण्यामागे सुरक्षेच्या नियामंचे उल्लंघन झालं, त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच पंतप्रधानांच्या दौऱ्यात पोलिस बंदोबस्ताशी संबंधित सर्व पुरावे भटिंडा जिल्हा न्यायाधीशांकडे सोपवण्यात यावेत यासाठी आदेश देण्याची मागणीही करण्यात आली.'

याचिकेत असंही म्हटलं आहे की, 'प्रोटोकॉलनुसार मुख्य सचिव आणि डीजीपी किंवा त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांची कार या ताफ्यात असायला पाहिजे. मात्र त्यावेळी अशी अधिकाऱ्यांची कोणतीही कार तिथं असल्याची माहिती मिळाली नाही.' त्यावरून पंतप्रधानांपर्यंत पोहोचण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली होती का असा प्रश्नही याचिकाकर्त्याने उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : नितेश राणे मुंब्रामध्ये दाखल

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT