court esakal
देश

लहान मुलांच्या प्रेमातील भांडणं सोडवायला POCSO कायदा नाही; हायकोर्टाने झापलं

सकाळ डिजिटल टीम

अलाहाबाद : किशोरवयीन मुला-मुलींमधील प्रेमप्रकरणांमधून निर्माण झालेला वाद सोडविण्यासाठी ‘पॉक्सो’ कायदा नाही, असे फटकारत अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज या कायद्याअंतर्गत अटक झालेल्या आरोपीला जामीन मंजूर केला. आपल्या मुलांना योग्य वळण लावण्यात पालक अपयशी ठरत असून पाल्याकडून गैरवर्तन झाल्यास त्याला पालकही जबाबदार ठरत असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले. (POCSO Act)

एका चौदा वर्षाच्या मुलीबरोबर पळून जात अतुल मिश्रा या युवकाने तिच्याबरोबर मंदिरात विवाह केला असून गेली दोन वर्षे ते एकत्र रहात आहेत. या दोन वर्षांत संबंधित अल्पवयीन मुलीने एका बाळालाही जन्म दिला आहे. या प्रकरणी अतुल मिश्राविरोधात बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पॉक्सो) तक्रार दाखल केली होती. आरोपी अतुल मिश्राने जामीनासाठी केलेल्या अर्जाला मंजुरी देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने परखड शब्दांत पालकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. किशोरवयीन मुले ‘पॉक्सो’ कायद्याच्या गैरवापराला बळी पडण्याचे अनेक प्रकार घडत असून, त्यांच्यावरील आरोपांमुळे होणारे गंभीर परिणाम समजून न घेता, वास्तव जाणून न घेता गुन्हा दाखल केला जात आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले.

संबंधित युवकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केलेला नाही, बळजबरी केलेली नाही, त्यांनी विवाह केला आहे, त्यामुळे ‘पॉक्सो’ कायदा अडथळा ठरू शकत नाही, असेही न्यायालयाने सांगितले.

पालकांना दिले धडे

पालकांचे पाल्याकडे होत असलेले दुर्लक्ष अधोरेखित करताना न्यायालयाने अशा पालकांनाही मूल्यशिक्षणाचे धडे दिले. ‘‘कायद्याच्या दृष्टीकोनातून गुन्हा झाल्यावर आरोपीविरोधात तक्रार दाखल केल्याने पालकांचे अपयश झाकले जात नाही. आपल्या पाल्यांना जीवनमूल्ये, कुटुंबाच्या परंपरा, जीवनाबाबतचा दृष्टीकोन आणि आयुष्यातील प्राधान्यक्रम याबाबत जाणीव करून देण्यात पालक सपशेल अपयशी ठरत आहेत. त्यामुळेच अशा प्रकारचे गुन्हे घडले तर त्याला निष्क्रीय पालकही तितकेच जबाबदार आहेत,’’ असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

रितेश देशमुखची शाळा पाहिलीत का? ना मुंबई, ना लातूर; 'या' ठिकाणी शिकलाय अभिनेता, मैदान पाहाल तर पाहतच राहाल

Latest Marathi News Updates : घनसावंगी शिवारातील पाझर तलाव फुटला

Sillod Rain : तीन तासाच्या पावसाने सर्वत्र दाणादाण; आमठाणा मंडळात 70 मिलिमीटर पाऊस, नऊ गावांचा काही तासासाठी तुटला संपर्क

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

SCROLL FOR NEXT