UP Police Beat Each Other For Front Seat In Patrol Vehicle 
देश

...म्हणून पोलिसांमध्ये हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था

कानपूर : पोलिसांच्या मोटारीमधील पुढील सीटवर कोण बसणार या कारणावरून पोलिसांमध्ये हाणामारी झाली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून पोलिसांवर टीका केली आहे.

उत्तर प्रदेश गुन्हेगारीमुळे नेहमीच चर्चेत असते. राज्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवली आहे. गस्तीसाठी चारचाकी वाहनेही आहेत. मात्र, या वाहनातील पुढील सीटवर कोण बसणार, या कारणावरून पोलिसांमध्ये चक्क हाणामारी झाली आहे. रस्त्यावरून जात असलेल्या एकाने हा व्हिडिओ शूट केला आहे.

संबंधित व्हिडीओमध्ये पोलिसांचे इनोव्हा वाहन दिसत असून, रस्त्याच्या कडेला दोन पोलिस गणवेशामध्ये दिसत आहेत. एका पोलिसाने दुसऱ्या पोलिसाला रस्त्याच्या कडेला नेत मारहाण केली. तिसरा पोलिस मारामारी सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मारहाण करणाऱया पोलिसांची ओळख पटली आहे. राजेश सिंग, सुनिल कुमार अशी त्यांची नावे आहेत. तिसऱ्या पोलिसाचे नाव समजू शकले नाही.

दरम्यान, उत्तर प्रदेशात पोलिसांमध्ये हाणामारी घटना यापूर्वीही घडली आहे. काही दिवसांपूर्वीच लाच घेण्यावरूनही दोन पोलिसांमध्ये हाणामारी झाली होती. नंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT