rape crime sakal media
देश

हरयाणा : अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; तीन जणांवर गुन्हा

नरेश शेंडे

हरयाणा : येथील जींद जिल्ह्यात धक्कादायक घटना घडलीय. दोन व्यक्तींनी १६ वर्षीय मुलीवर बलात्कार (Minor girl rape crime) केल्याची संतापजनक घटना समोर आलीय. हे नराधम पीडित मुलीचा व्हिडिओ काढून पैशांसाठी तिला धमकावत होते. याप्रकरणी पीडितेच्या आईनं पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात शनिवारी रात्री तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पोक्सो (Pocso) अंतर्गत तीन आरोपींवर गुन्हा दाखल (police FIR on three culprits) केला आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. (Police complaint filed on three culprits in minor girl rape crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ५ ऑगस्टला पीडित मुलगी शेजारी भाड्याने राहत असलेल्या महिलेला भेटायला गेली होती. त्यावेळी या आरोपींनी पीडितेवर बलात्कार करुन तिचा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर आरोपींनी पीडितेला ब्लॅकमेल करुन तिच्याकडे पैशांची मागणी केली.

पीडितेला व्हिडिओच्या माध्यमातून धमकावण्याचं सत्र त्यांनी सुरुच ठेवलं. त्यानंतर पीडित मुलीनं अखेर घडलेला सर्व प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी तिन आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

SCROLL FOR NEXT