police inspector shot his two son with service revolver 
देश

पोलिस निरीक्षकाने काढला रिव्हॉल्व्हर अन् झाडल्या गोळ्या...

वृत्तसंस्था

कैथल (हरियाणा) : एका पोलिस निरीक्षकाने रिव्हॉल्व्हर काढला आणि गोळ्या झाडायला सुरवात केली. यामध्ये त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाला तर दुसरा मुलगा जखमी झाला आहे. घरगुती वादामधून ही घटना घडली आहे. पोलिस निरीक्षक पळून गेला असून, पोलिस शोध घेत आहेत.

कैथल जिल्ह्यातील पोलिस वसाहतीमध्ये ही घटना घडली आहे. घरामध्ये रात्री बाराच्या सुमारास घरगुती वाद सुरू झाला. सतवीर नावाच्या पोलिस निरीक्षकाने यानंतर रिव्हॉल्व्हर काढला आणि गोळ्या झाडायला सुरवात केली. यामध्ये एका मुलाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. गोळीबार सुरू केल्यानंतर दोन्ही मुलांच्या पत्नीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्या सुद्धा जखमी झाल्या आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर सतवीर पळून गेला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

पोलिस अधिकारी प्रल्हाद सिंह यांनी सांगितले की, याबाबतच्या चौकशीसाठी रुग्णालयात जात आहे. कशामुळे गोळीबार केला हे तपासानंतर स्पष्ट होईल. पण, घरगुती कारणावरून त्यांनी गोळीबार केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे.

दरम्यान, हरियाणामध्ये लॉकडाऊनमुळे पोलिसांवार कामाचा ताण येत आहे. हिसारमध्येही शिपाई विक्रमने पत्नीही हत्या केली. गुरुग्राममध्ये पोलिस निरीक्षकाने आत्महत्या केली. शिवाय, आजही गोळीबाराची घटना घडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

विराट कोहलीचा खळबळजनक खुलासा; म्हणाला, मी 'इम्पोस्टर सिंड्रोम'चा सामना करत होतो! राहुल द्रविड नसते तर...

CBI Strict Action NEET : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे समोरासमोर बसून होणार चौकशी, सीबीआय कडक पाऊल उचलणार

सूर्याचा प्रकोप सुरुच...! शुक्रवारपर्यंत उष्णतेचा ‘ऑरेज अ‍ॅलर्ट’, नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

Mohammed Shami न खेळण्यामागचं कारण? इयान बिशप यांच्या प्रश्नावर रिषभ पंत गांगरला... त्याच्या हावभावामुळे काहीतरी बिनसल्याचं संशय

SCROLL FOR NEXT