police officer asks girl to dance before filing fir at uttar pradesh 
देश

पोलिस युवतीला म्हणाले; अगोदर नाचून दाखव...

वृत्तसंस्था

कानपूर (उत्तर प्रदेश): एक युवती तक्रार देण्यासाठी पोलिस चौकीत गेली होती. यावेळी पोलिसांनी तिला प्रथम नाचून दाखवण्यास सांगितले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून पोलिसांवर टीका केली आहे.

कानपूरजवळील दुबाऊलीमधील गोविंद नगर येथे भाड्याच्या घरात राहणार्‍या युवतीचे कुटुंब जागरण गोंधळ करुन उदर्निवाह करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी घर मालकाचा पुतण्या अनुप यादव आणि युवतीच्या कुटुंबामध्ये वाद झाला. अनुपने मुलीची छेड काढली. शिवाय, कुटुंबाला घर सोडण्यास सांगून घरातील साहित्य घराबाहेर फेकून दिले. घरात घुसून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. संबंधित घटना 26 जुलै रोजी घडली होती. या घटनेनंतर 7 ऑगस्ट रोजी रात्री माझी मुलगी बाजारामधून घरी येत असतानाच अनुपने तिची छेड काढली. त्यानंतर आम्ही गोविंद नगरचे पोलिस निरीक्षक अनुराग मिश्रा यांच्याकडे तक्रार देण्यासाठी गेलो होतो. यावेळी त्यांनी माझ्या मुलीला आधी नाचून दाखव त्यानंतरच आम्ही तक्रार दाखल करुन घेऊ असे सांगितले, असे युवतीच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, पोलिस चौकीमधील युवतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित घटना चर्चेत आली आहे. याबाबत वरिष्ठ पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT