Central Bureau of Investigation esakal
देश

बीरभूम हत्याकांडप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना अटक होणार?

सकाळ डिजिटल टीम

सीबीआयला महत्त्वाचे पुरावे मिळाल्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना केव्हाही अटक होऊ शकते.

केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचं पथक (Central Bureau of Investigation, CBI) पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट इथं बीरभूम हिंसाचार (Birbhum Violence) प्रकरणाचा तपास करत आहे. सीबीआय अधिकारी परिसरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मोबाईल फोनचे कॉल रेकॉर्ड तपासत असून यासाठी त्यांनी तांत्रिक टीमचीही मदत घेतलीय. तपासादरम्यान सीबीआयला अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले असून पश्चिम बंगालाचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी त्यांच्या निशाण्यावर आहेत. सीबीआयला आणखी महत्त्वाचे पुरावे मिळाल्यास बीरभूम हिंसाचार प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना (Police Officers) केव्हाही अटक होऊ शकते.

बोगतुई हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी रामपूरहाट स्टेशन प्रभारी त्रिदीप प्रामानिक आणि रामपूरहाट एसडीपीओ सायन अहमद यांना आधीच निलंबित केलं होतं. या प्रकरणी गुप्तचर अधिकाऱ्यांसह 12 नागरी स्वयंसेवकांनाही निलंबित करण्यात आलंय. ममता बॅनर्जी यांनीही रविवारी पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती, तरीही त्या त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय तांत्रिक पथकाची मदत घेत आहे. सीबीआय सुरुवातीला पोलिसांच्या मोबाईलवरील कॉल रेकॉर्ड गोळा करत आहे. भोदू शेखच्या हत्येनंतर पोलीस ठाण्याच्या व जिल्ह्यातील उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका काय होती? ते आपापसात किती वेळा बोलले याचे रेकॉर्ड गोळा केले जात आहेत. कोलकाता उच्च न्यायालयानं यापूर्वीच सीबीआयला निर्देश दिले आहेत की, ते कोणाचीही चौकशी करू शकतात आणि कोणालाही अटक करू शकतात. अशा स्थितीत आज पीडितांशी बोलल्यानंतर सीबीआयला (CBI) अनेक पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध पुरावे सापडलेत. बीरभूम जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) नागेंद्रनाथ त्रिपाठी आणि इतर अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी आता सीबीआयच्या रडारवर आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपूरहाट पोलिस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी निरीक्षक त्रिदीप प्रामानिक आणि रामपूरहाटचे तत्कालीन एसडीपीओ सायन अहमद यांची स्वतंत्रपणे चौकशी केली जाऊ शकते, असंही बोललं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT