Untitled-2.jpg 
देश

प्रियांका गांधींच्या आरोपावर पोलिस अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, पाहा...

वृत्तसंस्था

लखनऊ ः (सीएए) विरोधात उत्तर प्रदेशात आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचारप्रकरणी एका माजी पोलिस अधिकाऱ्याची भेट घेण्यासाठी जाताना पोलिसांनी मला अडवले. माझा गळा दाबला आणि मला ढकलून दिले, असा गंभीर आरोप काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी शनिवारी उत्तर प्रदेश पोलिसांवर केला होता. पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी असलेल्या एस. आर. दारापुरी यांची भेट घेण्यासाठी प्रियांका गांधी काँग्रेसच्या राज्य मुख्यालयातून निघाल्या होत्या. मात्र, लोहिया चौकात पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर पायी चालत जात असताना पोलिसांनी मला घेरले, आणि एका महिला पोलिस कर्मचारीने माझा गळा दाबला. मला धक्का दिला त्यामुळे मी जमिनीवर पडले. त्यानंतर मी एका कार्यकर्त्याच्या टू-व्हिलरवरून जात असताना पुन्हा माझी अडवणूक करण्यात आली, अशी माहिती प्रियांका गांधी यांनी एएनआयशी बोलताना दिली होती.

प्रियांका पुढे म्हणाल्या की, 77 वर्षांचे माजी पोलिस अधिकारी दारापुरी यांनी शांततेच्या मार्गाने निदर्शने करावीत, अशा आशयाची फेसबुक पोस्ट प्रदर्शित केली होती. त्यांची पत्नी आजारी असतानाही पोलिसांनी त्यांना अटक केली. भाजप सरकारच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांशी अशा प्रकारचे वर्तन केले जात आहे. मात्र, या दडपशाहीला आम्ही बळी पडणार नाही. आमचा सत्याग्रह आहे. मी उत्तर प्रदेशची प्रभारी असल्याने राज्यात कुठे जायचे याचा निर्णय भाजप सरकार घेऊ शकत नाही. भाजप भ्याडपणाने हल्ले करत आहे.

दारापुरी यांच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर प्रियांकांनी माध्यमाशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मी गाडीमधून शांततेने प्रवास करत होते. मग यामुळे कायदा आणि सुव्यवस्था कशी काय बिघडणार होती? माझ्यासोबत तीनपेक्षा जास्त लोक नव्हते. आणि मी याची कल्पना कोणालाही दिली नव्हती. मला अडविल्यानंतरही मी चालत गेले. तर मला थांबवण्याचा अधिकार यांना कुणी दिला? जर मला अटक करायची असेल तर करा.'

यावर आता पुलिस क्षेत्राधिकारी अर्चना सिंह यांनी वरिष्ठांना दिलेल्या माहितीनुसार गांधी यांच्या दाैऱ्यावेळी त्यांना या ठिकाणी फ्लीट प्रभारीची ड्यूटी लावली होती. गांधी या गोखले मार्गाने काैल हाऊसला जाण्यासाठी निघाल्या होत्या, परंतू त्या ठरलेल्या मार्गाने जात नसल्याने तसेच त्या लोहीया रस्त्याने जाऊ लागल्याने आम्ही त्यांना असे का करता आहात याबाबत विचारले. तसेच याबाबत आम्ही पक्षाच्या इतर नेत्यांना  विचारले परंतू त्यांनी कोणीही याबाबत माहिती देण्यास नकार दिला. त्यानंतर गांधी या दुचाकीवरून उतरून पायी चालू लागल्या, गांधी यांचा गळा पकडला आणि खाली पाडले अशा काही भ्रामक बाबी सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. या सगळ्या खोट्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT