श्रीनगर
श्रीनगर  सकाळ
देश

श्रीनगर : दहशतवाद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या, 7 वर्षांची मुलगी जखमी

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashimir) श्रीनगरमधील सौरा भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून हत्या केली. तर या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याची 7 वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. श्रीनगर जिल्ह्यातील सुरा भागात हा हल्ला झाला. सैफुल्लाह कादरी असे या घटनेत मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. (J & K Policeman Shot Dead By Terrorist )

दहशतवाद्यांनी हवालदार सैफुल्लाह कादरी यांच्या सौरा भागात असलेल्या घरावर गोळीबार केला. यामध्ये कादरी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारांसाठी रूग्णालयात नेण्यात आले. परंतु, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामध्ये कादरी यांची सात वर्षांची मुलगीदेखील जखमी झाली असून, तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांत दहशतवाद्यांनी स्थानिक सैनिक, पोलीस आणि अल्पसंख्याक समुदायातील लोकांवर हल्ले वाढवले आहेत. एवढेच नाही तर परराज्यातून आलेल्या लोकांवर हल्ले करण्याचे प्रमाणही वाढले आहे. ऑपरेशन ऑल आऊटमुळे सुरक्षा दलाच्या रोषामुळे दहशतवादी असे हल्ले करत असून त्यामुळे दहशत निर्माण होत असल्याचे मानले जात आहे. काश्मिरी पंडितांना परत आणण्याचे प्रयत्न, पंचायत निवडणुकीत लोकांचा सहभागही दहशतवाद्यांकडून धोक्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT