Delhi liquor Scam
Delhi liquor Scam sakal
देश

Delhi liquor Scam : ‘आप’ला राष्ट्रपती राजवटीची भीती ; षड्‌यंत्र असल्याचा आतिशी यांचा दावा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारच्या विरुद्ध मोठे राजकीय षड्‌यंत्र रचले जात असून, येत्या काही दिवसांत भाजपशासित केंद्र सरकार दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करणार आहे, असा खळबळजनक आरोप ‘आप’च्या नेत्या आणि मंत्री आतिशी यांनी आज केला.

दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आम आदमी पक्षाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असली तरी दिल्ली उच्च न्यायालयाच्या टिप्पणीमुळे पक्षाची कोंडी झाली असून राष्ट्रपती राजवटीची भीतीही पक्षातून व्यक्त होत आहे.

त्यापार्श्वभूमीवर दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी आज राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तविली. सरकारच्या विरोधात मोठे राजकीय षडयंत्र सुरू असून येत्या काही दिवसात केंद्र सरकारतर्फे दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होईल, असा दावा आतिशी यांनी केला.

नायब राज्यपालांनी मागील काही दिवसांत दिल्ली सरकारविरुद्ध गृह खात्याला लिहिलेल्या पत्रांकडेही आतिशी यांनी लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, की दिल्लीतील महत्त्वाच्या विभागांमध्ये अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून नायब राज्यपाल मागील आठवडाभरापासून दिल्ली सरकारच्या विरोधात अकारण पत्र लिहित आहेत. वीस वर्षांपूर्वीचे जुने प्रकरण उकरून काढून मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाला बडतर्फ करण्यात आले.

यावरून दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा कट रचला जात असल्याचे दिसून येत आहे. भाजपला जाणीव आहे की कितीही प्रयत्न करूनही अरविंद केजरीवाल यांना पराभूत केले जाऊ शकत नाही. त्यामुळे केजरीवाल यांचे लोकनियुक्त सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मंत्री आतिशी यांनी केला.

सौरभ भारद्वाज यांचाही आरोप

आप सरकारमधील अन्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तविताना भाजपला लक्ष्य केले. भाजप आणि नायब राज्यपालांकडून दिल्लीतील कथित घटनात्मक संकटाबद्दल वारंवार बोलले जात आहे. दिल्लीत पराभूत झालेल्या भाजपला जाणीव आहे की, आज दिल्लीत निवडणूक झाली तर अरविंद केजरीवाल पुन्हा विजयी होतील. त्यामुळे षड्‌यंत्र रचून दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी भाजपशासित केंद्र सरकारतर्फे सुरू आहे, असा दावा सौरभ भारद्वाज यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT