RSS 
देश

"RSS, बजरंग दलवर बंदी घालून दाखवा, तीन महिन्यात..." ; भाजपचे काँग्रेसला खुलं आव्हान

Sandip Kapde

कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्या वक्तव्यानंतर कर्नाटकमध्ये राजकारण तापले आहे. प्रियांक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी घालण्याच्या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने असे काही केले तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले.

बोम्मई म्हणाले, काँग्रेस बदल्याच्या भावनेतून राजकारण करत आहे. त्यांनी जेव्हा आरएसएसवर बंदीची घोषणा केली लोकांनी त्यांना घरी पाठवले आहे. मी त्यांना आव्हान देतो की त्यांनी बंदी घालून दाखवावी.

कॅबिनेट मंत्री प्रियांक खरगे यांच्या वक्तव्यावर कर्नाटकचे माजी मंत्री आर. अशोक यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “तुमचे वडील आरएसएसवर बंदी घालू शकले नाहीत, दादींनी देखील हे केले नाही. तुमचे आजोबा सुद्धा करू शकले नाहीत. तर आता तुम्ही काय करू शकणार?", असा प्रश्न अशोक यांनी केला आहे.

एकेकाळी काँग्रेसचे संसदेत बहुमत होते आणि देशातील १५-२० राज्यांमध्ये सरकारे होती. मात्र अशा वक्तव्यामुळे  काँग्रेसची अवस्था वाईट झाली आहे. हिंमत असेल तर आरएसएसवर बंदी घाला, तुमचे सरकार तीन महिनेही टिकणार नाही, असे अशोक यांनी म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांचा पक्ष कर्नाटकमध्ये बजरंग दलावर बंदी घालण्यास तयार आहे. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणत्याही संघटनेवर बंदी घालण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, मग ती आरएसएस असो वा बजरंग दल किंवा अन्य कोणतीही जातीयवादी संघटना असो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill : शुभमन गिलचं T20 World Cup साठी भारतीय संघात स्थान न मिळण्यावर मोठं विधान; म्हणाला, निवड समितीने...

Makar Sankranti 2026: एकाच दिवशी 4 दुर्मिळ योगायोग! सूर्यदेव कोणत्या वाहनावर होणार स्वार?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयीन चौकशी पूर्ण; छाननी समिती कशासाठी?

Nashik News : तुमच्या खिशातील चिल्लर तुम्हाला बनवू शकते लखपती? नाशिकमध्ये नाणी-नोटांच्या खरेदी-विक्रीची धूम

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२६' समारंभाचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT