Sharad Pawar, opposition Leader, Mharashtra, Delhi, NCP, Congress 
देश

महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीत दिसणार? शरद पवारांनी नेतृत्व करावे ही सर्व विरोधी पक्षांची इच्छा!

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली : 'चलो दिल्ली' असा नारा देत कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी मोदी सरकार विरोधात पेटून उठले असताना राजकीय गोटात सत्ताधारी पक्षाविरोधात मोर्चेबांधणीचा नवा डाव रचण्यात येत असल्याचे वृत्त चर्चेत आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी इतर मित्र पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्यासोबत नुकतीच राष्ट्रपतींची भेट घेतली होती. कृषी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार आणि  सीपीएमचे नेते सीताराम येचुरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.   

या घटनेनंतर शरद पवार हे विरोधी पक्षाच्या नेतृत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत, अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झालीय. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी शरद पवारांकडे विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चाही जोर धरु लागली आहे. राजकीय वर्तुळात रंगत असलेल्या चर्चेनुसार, कृषी कायद्याच्या संदर्भातील भूमिकेसंदर्भात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. भाजप विरोधातील मोर्चबांधणीसाठी पवारांनी पुढाकार घ्यावा. एवढेच नाही तर केंद्रातील महा आघाडीचे नेतृत्व करावे, अशी इच्छाही काँग्रेसच्या नेत्याने शरद पवारांना बोलून दाखववी आहे.  

एबीपीने सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. यावेळी महाराष्ट्राप्रमाणे देशात भाजपला कडवे आव्हान देण्यासाठी शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करावे, असा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांनी मांडला. सध्याच्या घडीला काँग्रेस कठिण परिस्थितीतून जात असून शरद पवारच नेतृत्वासाठी योग्य ठरतील, असे सोनिया गांधींनाही म्हटल्याचे काँग्रेस नेत्याने या भेटीवेळी सांगितले. या राजकीय चर्चेसंदर्भातील वृत्ताची ई सकाळ ऑनलाईनकडून कोणतीही खातरजमा करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर असतानाही शरद पवारांनी राहुल गांधी यांच्यामध्ये सातत्याचा अभाव असल्याचे भाष्य केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शस्त्रसंधीसाठी अटी! होर्मुझवर इराणसह ओमानही आकारणार टोल; भारताकडूनही वसुली?

Chhatrapati Sambhajinagar: डिजिटल रुपया काळाची गरज; रोख व्यवहारांना पर्याय; सुरक्षित, जलद, पारदर्शक अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

Latest Marathi News Live Update: माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ खासदार मोहसिना किडवई यांचे निधन

Beed News: बीडकरांची तहान भागणार कशी?; ३४ कोटींच्या थकीत बिलामुळे नागरिकांचा घसा कोरडाच; अमृत योजनेला ३४ कोटींचा शॉक

Plane Service : इराण युद्धाचा विमानसेवेला फटका; दहा हजार आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

SCROLL FOR NEXT