देश

विमा नूतनीकरणासाठी वैध PUC प्रमाणपत्र दिलं जातंय का? निर्देशांच्या पालनासाठी विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार

सुमित बागुल

नवी दिल्ली : इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऍथॉरिटी म्हणजेच IRDAI ने एक अत्यंत महत्त्वपूर्ण नियमावली जारी केली आहे. यामध्ये कुणालाही आपल्या वाहनाचा विमा रिन्यू करायचा असल्यास आता वैध PUC सर्टिफिकेट दाखवणे बंधनकारक असणार आहे. IRDAI ने देशातील सर्व इन्श्युरन्स कंपन्यांना याबाबत निर्देश जारी केलेत. 

खरंतर यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निर्देश दिलेत. इन्श्युरन्स कंपन्यांनी विमा पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या तारखेला वैध PUC प्रमाणपत्र नसल्यास वाहन विमा काढून  देऊ नये असे निर्देश जारी केले होते. त्यानंतर आता IRDAI ने सर्व विमा कंपन्यांना एक परिपत्रक जारी केलंय. जेणेकरुन सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन केलं जातेय का ? यावर विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दिल्ली-एनसीआर भागात या नियमांचं पालन होतंय का त्यावर विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे. 

याबाबत सर्व विमा कंपन्यांच्या CEO आणि CMD यांना संबोधित केलेल्या पत्रकात नियामक मंडळाने नमूद केलंय की, “केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने  सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे पालन करण्यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये मुख्यत्वे दिल्ली - एनसीआर भागात या नियमांचे पालन होतंय का, याची कृपया खात्री करुन सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करा असं यामध्ये नमूद करण्यात आलंय.  

पीयूसी प्रमाणपत्र हे एक असं डॉक्युमेंट आहे, जे राज्य शासनाच्या अधिकृत गणवेशातील पोलिस अधिकाऱ्याकडून तपासणीसाठी कधीही मागितलं जाऊ शकतं. वाहनांमधील प्रदूषण तपासणाऱ्या अधिकृत केंद्रांमधून अशा प्रकारचं PUC प्रमाणपत्र दिलं जातं. ज्या गाड्यांमधून सरकारकडून ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणेच प्रदूषणाचे उत्सर्जन होतंय त्यांनाच हे प्रमाणपत्र दिलं जातं. 

Pollution certificate now mandatory to renew motor insurance IRDAI

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT