Delhi Police Shares Post Esakal
देश

Delhi Police Shares Post: "तुम्ही अंडरटेकर किंवा स्पेशल केस नाही जे मृत्यूनंतर...", पूनम पांडे प्रकरणादरम्यान दिल्ली पोलिसांचा खास मेसेज

Delhi Police Shares Post : गेल्या दोन दिवसांपासून मृत्यूच्या अफवेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री पूनम पांडे हिच्या प्रकरणाशी संबध लावत दिल्ली पोलिसांनी प्रवास करत असताना काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Delhi Police Shares Post : गेल्या दोन दिवसांपासून मृत्यूच्या अफवेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री पूनम पांडे हिच्या प्रकरणाशी संबध लावत दिल्ली पोलिसांनी प्रवास करत असताना काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे.

रस्त्यावर प्रवास करत असताना सुरक्षेसाठी आवाहन करताना दिल्ली पोलिसांनी लिहिले की, "तुम्ही अंडरटेकर, मिहीर विराणी किंवा कोणतीही विशेष केस नाही जे मेल्यानंतर परत जिवंत व्हाल." दरम्यान अनेक जण याचा संबध पूनम पांडेशी जोडत आहेत.

दिल्ली पोलिस सोशल मीडियावर ट्रेंडिंग कंटेंटद्वारे दररोज आवाहन करत असतात. अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या मृत्यूच्या अफवेवर दिल्ली पोलिसांनी अनोख्या पद्धतीने लोकांना आवाहन केले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये पूनम पांडेचे नाव न घेता लोकांना एक संदेश देण्यात आला आहे. सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी सीट बेल्ट आणि हेल्मेट घालण्याबद्दल एक पोस्ट आहे, "तुम्ही काही विशेष केस नाहीत, जे मृत्यूनंतर पुन्हा जिवंत व्हाल."

दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "तुम्ही अंडरटेकर, मिहीर विराणी किंवा कोणतीही विशेष केस नाही जे मृत्यूनंतर पुन्हा जिवंत व्हाल. त्यामुळे नेहमी हेल्मेट आणि सीट बेल्ट यांचा वापर करा."

पोस्टमध्ये नमूद केलेले लोक अंडरटेकर, मिहिर विराणी आणि एक विशेष केस आहेत. अंडरटेकरचे खरे नाव मार्क विल्यम कॅलवे आहे आणि तो एक व्यावसायिक कुस्तीपटू आहे जो WWE मध्ये त्याच्या नाट्यमय प्रवेशासाठी आणि विशेषतः त्याच्या स्टंटसाठी प्रसिद्ध आहे. वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) मधील त्याच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत त्याने ही युक्ती वापरली आहे.

तर दुसरे नाव मिहीर विराणी या काल्पनिक पात्राचे आहे, जो 'सास भी कभी बहू थी' या मालिकेतील एक पात्र आहे आणि मालिकेत तो अनेकवेळा मृत्यूनंतर जिवंत झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याचवेळी दिल्ली पोलिसांनी पूनम पांडेचे नाव न घेता 'स्पेशल केस' लिहिले आहे पण सोशल मीडिया यूजर्सने ते लिंक केले आहे.

दिल्ली पोलिसांची ही पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे आणि लोकांनी त्वरित 'स्पेशल केस' म्हणून वर्णन केलेल्या व्यक्तीची ओळख पटवली आहे. एका युजरने कमेंट केली, "आणि तूम्ही पूनम पांडे नाही." आणखी एका युजरने लिहिले की, "स्पेशल केस (पूनम पांडे)", तर दुसऱ्याने गंमतीत कमेंट केली,

अलीकडेच अभिनेत्री पूनम पांडेच्या इन्स्टाग्रामवरून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे तिचा मृत्यू झाल्याची पोस्ट करण्यात आली होती. या खळबळजनक बातमीच्या 24 तासांनंतर, पूनम पांडेने स्वत: एक व्हिडिओ शेअर केला आहे की तिने जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी ही खोटी बातमी पसरवली आहे. यानंतर लोकांमध्ये तिच्याविरोधात संताप निर्माण झाला असून गुन्हा दाखल झाल्याची चर्चा आहे. लोक याला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत आणि यासाठी पूनमवर कडक कारवाई करण्याची मागणीही करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT