देश

Poonch: अंतिम हल्ला, पॅरा कमांडोजनी जंगलात दहशतवाद्यांना घेरलं

लष्कराने अंतिम हल्ल्यासाठी मोठी तयारी केली आहे. ऑपेरशन दरम्यान जिवीतहानी होऊ नये, यासाठी लष्कराने स्थानिक गावकऱ्यांना त्यांच्या घरी परतण्याचे आवाहन केले आहे.

दीनानाथ परब

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या (jammu-kashmir) पूँछ जिल्ह्यातील (poonch district) जंगलात लष्कर (Army) आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (encounter) सुरु आहे. अलीकडच्या काही वर्षातील ही सर्वात मोठी चकमक आहे. काल लष्करप्रमुख एम.एम.नरवणे दोन दिवसांचा जम्मू दौरा आटोपून निघाल्यानंतर लष्कराने अंतिम हल्ल्याची तयारी सुरु केली आहे. मागच्या आठवड्याभरापासून ही चकमक सुरु आहे. मेंढार तहसीलच्या नारमधील भाटा दुरीयन भागातील जंगलात हे दहशतवादी लपून बसल्याचा संशय आहे.

लष्कराने अंतिम हल्ल्यासाठी मोठी तयारी केली आहे. ऑपेरशन दरम्यान जिवीतहानी होऊ नये, यासाठी लष्कराने स्थानिक गावकऱ्यांना त्यांच्या घरी परतण्याचे आवाहन केले आहे. घरातच थांबण्यास सांगितले आहे. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मशिदीच्या लाऊडस्पीकरवरुन हे आवाहन करण्यात आले आहे.

दहशतवाद्यांच्या या शोध मोहिमेत फार यश हाती लागलेले नाहीय. पॅरा कमांडोज या ऑपरेशनमध्ये उतरले आहेत. ड्रोन्स, हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत आहे. दहशतवाद्यांना निसटता येऊ नये, यासाठी जवान, कमांडोजनी त्या भागाला घेराव घातला आहे. शनिवार सकाळपासून दहशतवाद्यांशी संपर्क प्रस्थापित होऊ शकलेला नाहीय. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

जंगलात आतमध्ये प्रवेश करताना खूप जपून पावलं टाकली जात आहेत. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी हवाई टेहळणी केली जात आहे. पूँछच्या जंगलात ११ ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत नऊ जवान शहीद झाले आहेत. यात दोन जेसीओ अधिकारी आहेत. मागच्या १७ वर्षातील हे सर्वात मोठं आणि सर्वाधिक वेळ चाललेलं घातक एन्काऊंटर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT