Narendra-Modi 
देश

पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार या पोर्टलचे उद्‌घाटन

पीटीआय

नवी दिल्ली - प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ''पारदर्शी कराधान - ईमानदार का सन्मान'' नावाच्या एक मंचाचे (पोर्टल) उद्या (ता.१३) व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) याबाबतची माहिती कळविली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उद्घाटन कार्यक्रमाला अर्थमंत्री निर्मला सीतारमन व राज्यमंत्री अनुराग ठाकुर हेही उपस्थित राहतील. या नव्या योजनेमध्ये प्राप्तिकर विभागाचे अधिकारी, लेखापरीक्षक महासंघ व वाणिज्य जगतातील नामवंत संस्थांचा सहभाग असेल. हा नवा मंच म्हणजे करभरणा करण्यातील ब्रिटिशकालीन क्‍लिष्टता टाळून ही प्रक्रिया सुलक्ष करण्यासाठीचे पाऊल असणार आहे. मोदी सरकारने मागील वर्षी उद्योगांवर लावण्यात येणारा कॉर्पोरेट टॅक्‍स ३० टक्‍क्‍यांवरून २२ टक्‍क्‍यांपर्यंत व नव्या उद्योजकांसाठी तर तो १५ टक्‍क्‍यांपर्यंत घटविण्याचा निर्णय केला होता.

नव्या योजनेत कर कमी करणे व प्रत्यक्ष कर कायदे आणखी सुलभ करण्यावर भर राहील. याशिवाय प्राप्तिकर विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता व दक्षता आणण्याचेही प्रयत्न केले जाणार आहेत. दिर्घकाळ प्रलंबित असलेल्या थकित करदात्यांसाठी या विभागाने ‘विवाद से विश्‍वास अधिनियम २०२०'' यापूर्वीच सादर केला आहे. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Longest Flyover : गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण! इंदोरा ते दिघोरी 8.9 किमीचा प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाला मिळणार डॉ. हेडगेवार यांचे नाव, जाणून घ्या नवीन पुलाविषयी...

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Lek Ladki Scheme : ‘लाडक्या लेकीं ’च्या पैशांवरही डल्ला! बीडमधील प्रकार, अधिकारी म्हणतात ३५९ मुलींच्या नावे दुबार निधी गेला

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

SCROLL FOR NEXT