akhilesh sakal
देश

भाजपकडून सत्तेच्या गैरवापराची शक्यता- अखिलेश यादव

उत्तर प्रदेशात राजकीय फायद्यासाठी भाजपकडून सत्तेचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी, भाजप मतदान केंद्रांवर लक्ष ठेवून आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केली

सकाळ वृत्तसेवा

लखनौ: उत्तर प्रदेशात राजकीय फायद्यासाठी भाजपकडून सत्तेचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी, भाजप मतदान केंद्रांवर लक्ष ठेवून आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केली. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजिबात वेळ न दडवता काम करावे, असे आवाहनही त्यांनी जारी केलेल्या निवेदनात केले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर कोणताही ढिसाळपणा असता कामा नये. आपल्याला दुसरी संधी मिळणार नाही, हे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विसरू नये. लोकशाहीचा सण असलेल्या निवडणुकांचे पावित्र्य राखण्यासाठी कार्यकर्त्यांनी सावध राहावे. त्याचप्रमाणे, ठोस धोरण आखावे. त्यामुळे भाजप जनतेला फसवू शकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

उत्तर प्रदेशमधील आर्थिक प्रगती दाखविण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने कोलकत्यातील उड्डाणपुलाची कथित प्रतिमा वापरल्यावरून वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात बोलताना अखिलेश यादव म्हणाले, की जिथे चांगले काम केले आहे, तिथे ते आपल्यामुळे झाल्याचा दावा करण्यास भाजपने कधी संकोच केला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : मुलगा व्हावा म्हणून 7 महिन्याच्या गर्भवतीवर विधीच्या नावावर अत्याचार, पीडितेचा पतीच खरातकडे कामाला; त्यानेच छुपा कॅमेरा लावला अन….

दादर-रत्नागिरी पॅसेंजर, सह्याद्री आणि गोदावरी एक्सप्रेस बंद; महाराष्ट्रातील ट्रेन सेवा कमी, यूपी-बिहारसाठी स्पेशल गाड्यांचा पाऊस

पती-मुलांसाठी घेतलेल्या 8 वर्षाच्या ब्रेकनंतर अनुष्का शर्माचं कमबॅक? तब्बल 1800 कोटींच्या सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

AI च्या हल्ल्याने २ वर्षांत उपग्रह हायजॅक? GPS-इंटरनेट होऊ शकते ठप्प; तज्ञांकडून भीषण आपत्तीची चेतावणी, नेमकं प्रकरण काय पाहा

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर आंबा काजू बागायतदारांचे चक्काजाम आंदोलन

SCROLL FOR NEXT