sushant shing Rajput, Bollywood Actor 
देश

दुःखाच्या प्रसंगी प्रायवसी जपा, सुशांतच्या कुटुंबियांची कळकळीची विनंती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : 'एमएस धोनी अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात धोनीची हुबेहुब भूमिका साकारुन त्याचा जीवनपट तमाम भारतीयांना दाखवून देणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना बॉलीवूड तसेच क्रिडा जगताला धक्का देणारी आहे. तणावातून सुशांतने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदन अहवालातील प्राथमिक माहितीनुसार त्याने आत्महत्या केल्याची पुष्टी झाली आहे. त्याचे अवयव तपासणीसाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याने ड्रग्स किंवा अन्य विषारी पदार्थाचे सेवन केले होते का याची तपासणी केली जाणार आहे. डॉ. एन आर कुपर सुशांतचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करणार असून या अहवालातून आणखी काही माहिती समोर येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

वांद्र्यातील राहत्या घरीत सुशांतने पंख्याला दोर बांधून गळफास लावून घेत आपल्या आयुष्याचा प्रवास संपवला आहे. या प्रकरणाचा तपास  मुंबई पोलिस झोन 9 चे डीसीपी अभिषेक त्रिमुखी करत असून त्याच्या खोलीमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू मिळाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबियांच्या वतीने एक निवदन जारी करण्यात आले आहे.

आम्ही त्याच्या चाहत्यांना प्रार्थना करतो की त्याचे विचार आणि काम सदैव लक्षात ठेवा. दुख:च्या प्रसंगी खासगी आयुष्य जपण्याची खबरदारी प्रसारमाध्यमांनी घ्यावी, अशी विनंतीही सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबियांनी केली आहे. सुशांतचा जन्म पटनामध्ये झाला होता. 2000 च्या सुरुवातीलाच त्याचे कुटुंबिय दिल्लीमध्ये स्थायिक झाले. त्याला 4 बहिणी आहेत. त्यातील मीतू राज्यस्तरावरील क्रिकेटपटू आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT