Droupadi Murmu 
देश

Droupadi Murmu: राष्ट्रपतींच्या भाषणावेळी अचानक गेली लाईट, अन्...; सुरक्षा रक्षकांची पळापळ

यावेळी राष्ट्रपतींना मंद प्रकाशात भाषण वाचलं, सुरक्षेत चूक झाल्यानं खळबळ उडाली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

भुवनेश्वर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणादरम्यान अचानक लाईट गेली त्यामुळं सुरक्षा रक्षकांची पळापळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओडिशातील महाराजा श्रीराम चंद्र भांजादेव (MSCB) विद्यापीठात शनिवारी हा प्रकार घडला. ही घटना ओडिशाच्या सरकारसाठी लाजीरवाणी घटनाच नाही तर राष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या दृष्टीनं खळबळ उडवणारा प्रकार होता. (Power outage for several minutes during President Droupadi Murmu speech at MSCB University at Odisha)

विद्यापीठाच्या १२व्या पदवीदान समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या. ओडिशाचे राज्यपाल गणेशी लाल यांचं भाषण सुरु असताना हा प्रकार घडला. शनिवारी सकाळी ११.५६ वाजता लाईट गेली ती १२.०५ मिनिटांनी आली. पण तब्बल दहा मिनिटं ही लाईट येऊ शकली नाही. यावेळी लाईट गेल्यानं ऑडिटोरिअममध्ये संपूर्ण अंधार पसरला होता, यामध्ये पोडिअमच्या मंद प्रकाशात राष्ट्रपतींनी भाषण केलं. पण यावेळी त्यांचे सुरक्षारक्षकही समोरुन दिसत नव्हते. यावेळी सभागृहात बसलेल्या ऑडिअन्सला देखील किर्र अंधाराबद्दल आश्चर्य व्यक्त केलं.

दरम्यान, सुरक्षा तज्ज्ञांनी म्हटलं की, ही परिस्थिती राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक होती. यावेळी राष्ट्रपतींनी देखील आपल्या भाषणादरम्यान, या परिस्थितीवर भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, सुंदरता जेतकी, अंधारा सेतकी अर्थात सौंदर्य आणि अंधार हे एकसारखेच आहेत.

या प्रकारच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले होते. यावेळी प्राथमिक माहिती ही समोर आली की, लाईट गेलीच तर त्यासाठी बॅकअप जनरेटर तयार ठेवण्यात आलं होतं. पण नेमकं राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यानच काहीतरी तांत्रिक बिघाड झाला अनं लाईट गेली. यावेळी जनरेटरचं बटण ऑन होतं पण ते काम करत नव्हतं. त्यानंतर टाटा पॉवर नॉर्थ ओडिशा डिस्ट्रिब्युशन लिमिटेडच्या (TPNODL) कर्मचाऱ्यांनी हा बिघाड दुरुस्त केला आणि त्यानंतर लाईट आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT