Prayan Rover _ Chandrayaan 3 
देश

Chandrayaan 3: अखेर प्रज्ञान रोव्हरचं 'मून वॉक' सुरु; ISRO नं दिली नवी अपडेट

भारताचं यान चंद्रावर उतरल्यानंतर हा प्रज्ञान रोव्हरच संशोधनाचं मुख्य काम करणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

बंगळुरु : भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान ३ मोहिमेतील विक्रम लँडरचं काल संध्या ६ वाजण्याच्या सुमारास चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग झालं. त्यानंतर या लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आला होता. पण आता २४ तासांनंतर या रोव्हरनं चंद्राच्या जमिनीवर चालायला सुरुवात केली आहे. इस्त्रोनं काही वेळापूर्वीच ही नवी अपडेट दिली. (Pragyan Rover moonwalk begins ISRO on Chandrayaan 3 mission)

इस्त्रोनं दिली नवी अपडेट

इस्त्रोनं ट्विट करुन रोव्हरनं आपलं काम सुरु केल्याचं ट्विट केलं. यामध्ये म्हटलं की, "चांद्रयान ३ रोव्हर टू एमओएक्स, ISTRAC, मून वॉक सुरु" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. तत्पूर्वी इस्त्रोनं यापूर्वी लँडर इमेजर कॅमेरानं चंद्रावर उतरण्याआधीच्या क्षणाचे काढलेले फोटो शेअर केले होते.

काय करणार प्रज्ञान रोव्हर?

प्रज्ञान रोव्हर हे सुरुवातीला आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेईल. त्यानंतर चंद्रावरील संशोधन प्रक्रिया सुरू करण्यात येईल. या मोहिमेचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करून भारताने या मोहिमेतील एक उद्दिष्ट पूर्ण केलं. यानंतर तेथील जमीनीवर पाण्याचा शोध घेणं, आणि खनिजांचा अभ्यास करणं हे उद्दिष्ट प्रज्ञान रोव्हर पूर्ण करणार आहे.

चाळीस दिवसांचा प्रवास पूर्ण

दरम्यान, पृथ्वीवरील उड्डाणानंतर चांद्रयान ३ हे चाळीस दिवसांनंतर बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं. यानंतर भारतानं इतिहास घडवत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा पहिला देश ठरला आहे. तसेच चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा देश ठरला. यापूर्वी ही कामगिरी, अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT