pranab mukharjee
pranab mukharjee 
देश

प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर; प्रकृतीत सुधारणा नाही

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूवर सोमवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. प्रणव मुखर्जी यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, 84 वर्षीय मुखर्जी यांची कोरोना टेस्टही करण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. 

प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ तयार झाली होती. त्यामुळे त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर मुखर्जींची प्रकृती गंभीर असून त्यात सुधारणा झाली नसल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे.
 

दरम्यान, प्रणव मुखर्जी यांनी ट्विटरवरून म्हटलं होतं की, रुग्णालयात आल्यानंतर कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्याच्या अहवालात कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलं होतं. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुखर्जी यांची तब्येत लवकर ठीक व्हावी अशी प्रार्थना केली आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांच्याकडे प्रकृतीची विचारपूस केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. 

काँग्रेसचे दिग्गज नेते असलेले प्रणव मुखर्जी यांनी 2012 ते 2017 या काळात देशाचे राष्ट्रपतीपद भूषवले होते. 2019 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. युपीए सरकारच्या काळात प्रणव मुखर्जी यांनी देशाचं अर्थ खातंही सांभाळलं होतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT