Prashant Kishor Sakal
देश

प्रशांत किशोर यांनी काँग्रेस अन् सोनिया गांधींना ब्लॅकमेल केलं? होतायेत आरोप

बिहारमधील रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यावर आरोप होत आहेत.

दत्ता लवांडे

गोवा तृणमूल काँग्रेसचे माजी अध्यक्ष किरण खांडोलकर यांनी प्रशांत किशोर यांच्यावर आरोप केले आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांवर खांडोलकर यांनी बोट ठेवलं असून त्यांच्यामुळे गोव्यात मत फुटल्याचा आरोप केला आहे.

गोव्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती त्यामध्ये त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. दरम्यान भारतीय जनता पार्टीने २० जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे.

दरम्यान गोव्यातील तृणमूल काँग्रेसचे माजी अध्यक्ष किरण खंडोलकर यांनी बिहारमधील रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यावर आरोप केले आहेत. प्रशांत किशोर यांनी पक्षात प्रवेश मिळवण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि सोनिया गांधी यांना ब्लॅकमेल केलं होतं, त्यामुळेच गोव्यातील निवडणुकांमध्ये मत फुटले आणि काँग्रेसचा पराभव झाला असा आरोप त्यांनी केला आहे.

किरण खांडोलकर यांनी आरोप करत प्रशांत किशोर हे अध्यक्ष सेनिया गांधी यांना ब्लॅकमेल करण्यासाठीच गोव्यात आले होते आणि त्यासाठीच त्यांनी गोव्याचं उदाहरण देत वापर केला आहे. जर तुम्ही मला काँग्रेसमध्ये घेतलं नाही तर आपलं मतदान कमी होईल असंही प्रशांत किशोर यांनी त्यावेळी सांगितलं होतं असा आरोप खांडोलकर यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT