Prashant Kishor Team eSakal
देश

प्रशांत किशोरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा अन् मग सल्ले द्यावे: रावत

गेल्या काही दिवसांपासून प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहे.

सुधीर काकडे

निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आतापर्यंत अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र काँग्रेस नेत्यांमध्ये बाहेरूनच सल्ला देण्याच्या त्यांच्या भुमिकेमुळे नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि काँग्रेस (Congress) वर्कींग कमीटीचे सदस्य हरीश रावत (Harish Rawat) यांनी प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना सल्ला दिलाय. एक कार्यकर्ता म्हणून आपण काँग्रेसमध्ये सामील होणार असाल तर आपलं स्वागत आहे, परंतु पक्षात सामील झाल्यानंतर आपल्या सांगण्यानुसारच पक्षाने काम केलं पाहिजे यासाठी आपण आग्रह करू शकत नाही. एखादी व्यक्ती कितीही सक्षम असली तरी त्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार पक्ष काम करू शकत नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

आम्ही नेहमी नवीन कल्पनांना व्यासपीठ देतो, त्यामुळे प्रशांत किशोद देखील पक्षात येऊ शकतात असं म्हणत रावत यांनी सांगितलं की, भारताचा नागरिक असलेला, स्वातंत्र्य चळवळीवर आणि कॉंग्रेसवर विश्वास ठेवणारा कोणताही व्यक्ती पक्षात सामील होऊ शकतो. त्यामुळं प्रशांत किशोरही पक्षात येऊ शकतात. मात्र पक्ष कोणत्याही एका व्यक्तीचा गुलाम होऊ शकत नाही, मग ती व्यक्ती कितीही सक्षम असो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT