Prashant Kishor receiving emergency medical care at a Patna hospital after sustaining injuries during a public rally.  esakal
देश

Prashant Kishor injured: प्रशांत किशोर यांना रॅलीदरम्यान मोठी दुखापत; पाटणामधील रूग्णालयात उपचार सुरू!

Prashant Kishor injured during rally: ...त्यानंतर प्रशांत किशोर भाषण न देताच घटनास्थळावरून निघाले अन् उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाले.

Mayur Ratnaparkhe

Prashant Kishor Suffers Injury During Political Rally: आगामी काळात बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. या शर्यतीत प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्षही मागे नाही. 

प्रशांत किशोर हे बिहारमध्ये पदयात्रा, रॅली करत आहेत. याच दरम्यान आज(शुक्रवार) त्यांना दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांना बिहारमधील आरा येथे एका रॅलीदरम्यान दुखापत झाली आहे. आरा येथे बिहार बदलाव रॅलीदरम्यान प्रशांत किशोर यांना छातीच्या बरगडीला दुखापत झाली. त्यानंतर प्रशांत किशोर भाषण न देताच उपचारासाठी पाटणा येथे परतले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, आरा येथे रॅलीदरम्यान प्रशांत किशोर गाडीच्या दरवाज्याजवळ लटकून उभा होते आणि जनतेला भेटत होते. याचदरम्यान प्रचंड गर्दी होती आणि गर्दीने प्रशांत किशोर यांना ढकलले. यामुळे गाडीचा दरवाजा त्यांच्या छातीवर आदळला. यानंतर त्यांना छातीत प्रचंड वेदना होवू लागल्याने त्यांना तातडीने आरा येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना पाटणा येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर प्रशांत किशोर यांना पाटणा येथे हलवण्यात आले असून, तेथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 प्रशांत किशोर बिहारमध्ये पदयात्रा करत आहेत. त्यांचा पक्ष जनसुराज यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवणार आहे. सध्या त्यांच्या जाहीर सभांमध्ये मोठ्या संख्येने लोकही जमत आहेत. प्रशांत किशोर आपल्या भाषणांमधून सातत्याने भाजप अन् मुख्यमंत्री नितीशकुमारांवर टीका करताना दिसत आहेत. तर काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांनी माजी भाजप खासदार उदय सिंह यांना आपल्या जनसुराज पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking! अनेकांसोबत शारीरिक संबंध; १०० कोटी उकळले, 'ती' महिला नेमकी कोण? धक्कादायक सत्य समोर

Pahalgam attack: 'टीआरएफ'चा जागतिक दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश; भारताकडून निर्णयाचं स्वागत

Raj Thackeray Warning Nishikant Dubey: ‘’दुबे तुम मुंबई मै आजाओ.., समंदर मै डुबे डुबे कर मारेंगें...’’ ; राज ठाकरेंचा कडक पलटवार!

Sangli Poisoning : कर्जबाजारी कुटुंबाने उचलेले टोकाचे पाऊल! विषप्राशनाने सासू-सुनेचा मृत्यू, वडीलांसह मुलाची प्रकृती गंभीर

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT